Pune Crime News: कौटुंबिक वादातून शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात तरुणानं संपवलं जीवन; पत्नी मुलांसह कोर्टात अन् तिथेच पत्नीच्या ओढणीने..
Pune Crime News: पत्नी, मुलांसह शिवाजीनगर न्यायालयात आलेल्या तरुणानं तिथेच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (शनिवारी, ता-8) सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अगदी किरकोळ कारणास्तव टोकाचं पाऊल उचललं (Pune Crime News) असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावरती समोर येत आहेत. असं असतानाच घरी भांडण झालं, त्या रागाच्या भरात आपण घटस्फोट घेऊ असं म्हणून पत्नी, मुलांसह शिवाजीनगर न्यायालयात आलेल्या तरुणानं तिथेच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (शनिवारी, ता-8) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. तरुणाने पत्नी आणि मुलांसमोरच पत्नीच्या ओढणीच्या सहाय्याने गळफास (Pune Crime News) घेत आपलं जीवन संपवलं. सोहेल येनघुरे (वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे.(Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल आणि त्याची पत्नी, दोन लहान मुलं हे पाषाण परिसरात वास्तव्यास आहेत. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून, पुण्यात वेठबगार म्हणून काम करतात. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेलचे आणि त्याच्या पत्नीचे किरकोळ कारणांवरून वाद झाले होते. शनिवारी त्यांची घरात जोराची भांडणं झाल्यानंतर सोहेलने रागाच्या भरात पत्नीला (Pune Crime News) आपण घटस्फोट घेऊ असं सांगितलं. त्यानंतर ते सर्व शिवाजीनगर न्यायालयात आले. शनिवारी न्यायालयीन कामकाज बंद असल्यामुळे ते न्यायालय आवारात गर्दी केलेली नव्हती. सोहेल, त्याची पत्नी आणि मुलांनी न्यायालय आवारात सोसायटी ऑफिसजवळील चिंचेच्या झाडाखाली जेवण केलं. त्यानंतर पुन्हा दोघांचा तिथे देखील वाद झाला. रागाच्या भरात सोहेलने पत्नीची ओढणी घेऊन पत्नी आणि मुलांसमोर चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घरगुती वादातून आईने घेतला मुलांचा जीव
घरगुती वाद झाल्याने आईने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून रागाच्या भरात आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून मारल्याचा प्रकार समोर आला आहे. झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने वार करत स्वतः पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे काल (शनिवारी, ता- 8) पहाटे घडली असून, पतीला बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शंभू ऊर्फ हर्ष दुर्योधन मिंढे (3), पियू दुर्योधन मिंढे (1) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत, तर पती दुर्योधन आबा मिंढे (35) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दौंड पोलिसांनी पत्नी कोमल दुर्योधन मिंढे (30) हिला ताब्यात घेण्यात आलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्योधन मिंढे हे आयटी कंपनीमध्ये स्वॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. मात्र, दोन वर्षांपासून ते घरूनच काम (वर्कफ्रॉम होम) करत होते, तर कोमल ही देखील बीएस्सी केमिस्ट्री झालेली आहे. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. शुक्रवारी रात्रीही पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर बेडरूममध्ये कोमल आणि तिची चिमुकली मुलगी पीयू झोपलेली होती. पहिल्यांदा तिने मुलीचा गळा दाबून तिचा जीव घेतला. त्यानंतर दुसऱ्या एका खोलीत आजीजवळ मुलगा शंभू झोपलेला होता. त्याला उचलून तिने बेडरूममध्ये आणले आणि त्याचाही गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर बाहेरच्या खोलीत झोपलेल्या नवऱ्याचा खून करण्याच्या मानसिकतेतून तिने त्याच्यावर कोयत्याने वार केला. यावेळी नवऱ्याने आरडाओरड केल्याने कोमल धावत आपल्या बेडरूममध्ये आली. तिने दरवाजा बंद करून घरातील चाकूने हाताच्या नस कापण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी घरातील लोकांनी दरवाज्याला धक्का दिल्याने दरवाजा उघडला आणि कोमल आत्महत्या करीत असताना तिला घरातील लोकांनी थांबवलं. मात्र त्या दोन चिमुकल्या जीवांचा प्राण गेला होता.























