एक्स्प्लोर

Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

Pune Crime News : पुण्यातील इंदापूरमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी दोन तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली होती.

पुणे : इंदापूर येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी दोन तासात वालचंदनगर येथून ताब्यात घेतलं आहे.गोळीबाराच्या घटनेनंतर इंदापूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी वालचंदनगर येथून या आरोपीला ताब्यात घेतले आहे. धीरज ऊर्फ सोन्या चोरमले असं त्याचं नाव असून तो शिरसोडी मधील आहे.  जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.  नाकाबंदीमध्ये पोलीस अधिकारी राजकुमार डिंगे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल ही ताब्यात घेतलयं. इंदापूर शहरातील आय काॅलेजसमोर सायंकाळी सातच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. यात राहुल अशोक चव्हाण हा जखमी झाला आहे. बारामती मधील महाविद्यालयाच्या आवारात झालेलं खून प्रकरण ताजं असताना घटना ताजी असताना पुण्याच्या इंदापुरामध्ये तरुणावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. या नंतर पोलिसांनी दौंड, यवत, वालचंदनगर, सोलापूर ग्रामीण शहर, धाराशिव भागात नाकाबंदी केली होती. इंदापूर पोलिसांनी या घटनेसंदर्भात बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यात 12 शस्त्र जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

गोळीबारानं एकच खळबळ

बारामती मधील घटना ताजी असतानाच इंदापूरमध्ये एका तरुणावर गोळीबार झाल्याचं समोर आलं होतं. या गोळीबाराच्या घटनेनं इंदापूरमध्ये खळबळ उडाली होती. पोलीस तपासात ज्याच्यावर गोळीबार झाला त्याचं नाव राहुल चव्हाण असल्याचं उघड झालं होतं.  

या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल  केलं. एक जण दुचाकीवरून आला आणि त्यानं तीन ते चार राऊंड फायर केले त्यापैकी तीन राऊंड राहुल चव्हाण याला लागले आणि तो जखमी झाला. 

बारामतीमधील खून प्रकरणानं खळबळ 

बारामतीमधील तुळजाराम चतुररचंद महाविद्यालयात भरदिवसा एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणामागील कारण समोर आलं आहे. गाडीवर कट मारल्याच्या रागातून बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला.  पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे तर, एक जण फरार आहे. 

इतर बातम्या :

Indapur : इंदापुरात गोळीबार, भर रस्त्यावर तीन राऊंड फायर, एकजण गंभीर जखमी; कायद्याची 'ऐसी की तैसी' सुरूच

VIDEO : लक्ष्मण हाके-मराठा आंदोलक पुण्यातील रस्त्यावर भिडले; हाकेंनी दारू प्यायल्याचा आंदोलकांचा दावा, मेडिकल टेस्ट करण्याचीही मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun fire : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरूABP Majha Headlines :  9:00 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVishwa Hindu Parishad Nagpur :गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लीमांना प्रवेश नाकारावा; आधारकार्ड तपासावेRajnath Singh on Modi :  खरगेंना सव्वाशे वर्षांचं आयुष्य लाभो; तोपर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल
Akshay Shinde Dead Body: अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर आता पोलिसांना करावी लागतेय मृतदेहाची राखण, दफनभूमीत सीसीटीव्ही लागला
अक्षय शिंदेचा मृतदेह पुरला, पण पोलिसांना सीसीटीव्ही लावून द्यावा लागतोय पहारा
Satara :  साताऱ्यात विद्यमान आमदार पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार, जागावाटपात कुणाला कोणती जागा मिळणार?
साताऱ्यात विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित, विरोधात कोण असणार? जागा वाटप कधी फायनल होणार?
Crime: क्यूआर कोड स्कॅन दाखवायचा पण पैसे कधी पोहोचलेच नाहीत, कॅबचालकानं फोनपेमार्फत केली अशी फसवूक
क्यूआर कोड स्कॅन दाखवायचा पण पैसे कधी पोहोचलेच नाहीत, कॅबचालकानं फोनपेमार्फत केली अशी फसवूक
Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Embed widget