Pune Crime News : BMW कारमधून उतरला अन्..., रस्त्यावर अश्लील चाळे अन् लघुशंका, त्या तरूणांचा व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने सांगितलं नेमकं काय घडलं?
Pune Crime News : पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरु करण्यात आला आहे. दरम्यान या गाडीचा नंबर समोर आला आहे. तर या दोन अश्लील कृत्य करणाऱ्या तरूणांचा व्हिडिओ काढलेल्या व्यक्तीने देखील व्हिडिओ शेअर करत घटनेची माहिती दिली आहे.

पुणे: पुणे शहरातील एका गजबजलेल्या मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध आपली बीएमडब्ल्यू कार उभी करून तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली, त्यानंतर एका व्यक्तीने त्या तरूणाला जाब विचारल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. हा तरूण मद्यधुंद असून त्याच अवस्थेत तो BMW कार चालवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने केलेल्या विचित्र कृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तसेच त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्रही मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणाबाबत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरु करण्यात आला आहे. दरम्यान या गाडीचा नंबर समोर आला आहे. तर या दोन अश्लील कृत्य करणाऱ्या तरूणांचा व्हिडिओ काढलेल्या व्यक्तीने देखील व्हिडिओ शेअर करत घटनेची माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं?
सुनील शिरसाट या व्यक्तीने येरवड्यातील अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ शुट केला आहे. तर व्हिडिओमध्ये दिसणारी बीएमडब्ल्यू कार MH-12AF 8419 ही मनोज आहूजा नावाच्या व्यक्तीच्या नावावर ही गाडी आहे, असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर व्हिडिओ शुट केलेल्या सुनील शिरसाट यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, आता आपण शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत, या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एक बीएमडब्ल्यू कार चालवणारा आला होता, त्याने अश्लील चाळे केले, भर रस्त्यात त्याने लघुशंका केली. तो आणि त्याचा मित्र होता, मी विचारल्यानंतर ते फुल स्पीडने वाघोलीकडे गेले. व्हिडिओमध्ये दिस आहे की दोघे दारू पिऊन गाडी चालवत आहेत. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे.
गाडीत बसलेला हा चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात त्याने अश्लील चाळे केले. हा आणि आतमधील त्याचा मित्र दोघेही दारू प्यालेले होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. सकाळच्या सुमारास तरुणाने एका सिग्नलवर ही अश्लील हरकत केली. पुणे नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात ही घटना घडली. दोन्ही तरूण BMW कारमध्ये बसले होते. या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे.
मागील घटनेतून पुणे पोलिसांनी धडा घेतला नाही
सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे. कारण ज्या परिसरात ही घटना घडली तो सर्व परिसर हा आयटी क्षेत्राचा आहे. त्या मार्गावर अनेक महिला मुलीची वर्दळ असते. याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका आयटी क्षेत्रातील मुलीवर चाकूने वार झाले आणि त्यात तिचा जीव गेला. मागील घटनेपासून पोलिसांनी काहीच धडा घेतलेला नाही, असे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

