(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EVM machine theft case : पुरंदर EVM मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठी कारवाई; तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित
Pune News : पुरंदर ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे : पुरंदर ईव्हीएम मशीन (Electronic Voting Machine) चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक (EVM machine theft case) आयोगाचा मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे (Pune Crime news) आदेश दिले आहेत. या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना (Senior Officers Suspended) निलंबित करून मुख्य सचिवांनी तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या EVM चोरी प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन अधिकाऱ्यांला निलंबित करण्यात आलं आहे. सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले EVM मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात 2 चोरांना या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिट ह जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे आणि या गुन्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहेत का? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.
सुट्टीचा फायदा घेत केली चोरी
सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ माजली होती.
पुण्यातील काँग्रेसकडून ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव
पुण्यातील काँग्रेसचे नेते, प्रदेश सरचिटनीस अॅढ अभय छाजेडा आणि प्रदेश कार्यकरणी सदस्य रमेश अय्यर यांनी ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. याबाबत आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड(Dhananjaya Chandrachud), न्या. जे बी पारडीवाला, न्या मनोज मिश्रा यांच्या खंडपिठासमोर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
इतर महत्वाची बातमी-