Pune crime news : विकृतीचा कळस! नराधमाने रेडकाचे पाय बांधले, मारहाण केली, मालकाने CCTV पाहिला अन् धक्कादायक बाब समोर
एका नराधम व्यक्तीने म्हशीच्या रेडकावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रकार घडला आहे.

पुणे : पिंपरी चिंचवडमधून (Pimpri chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहराच्या जाधववाडी परिसरात एका नराधम व्यक्तीने म्हशीच्या रेडकावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चिखली पोलिसांनी रामकिशन चौहाण या 24 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. त्यांच्या या विकृत कृत्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.
जाधववाडी परिसरात गणेश जाधव यांचा गोठा आहे. त्यात बांधण्यात येणाऱ्या रेडकाचे पाय बांधल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गोठ्यात सीसीटीव्ही बसवत त्याची तपासणी केली. त्यात रामकिशन गोठ्यात येत असल्याचे आढळल्यानंतर जाधव यांनी चिखली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करत घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
रोज सकाळी मालक ज्यावेळी गोठ्यात यायचा तेव्हा मालकाला रेडकाचे पाय बांधल्याचं दिसत होतं. त्यामुळे हे असं का घडतंय?, हे पाहण्यासाठी मालकाने थेट गोठ्यात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवस या सीसीटीव्हीवर पारख ठेवली. एक दिवस पहाटे गोठ्याचा लाईट बंद असल्याचं मालकाच्या नातेवाईकांनी सांगितलं. त्यावेळी मालकाने थेट गोठ्यात जाऊन पाहणी केली. आतून कडी लावली असल्याचे लक्षात आले. तर पत्रा उचकटून कोणी तरी निघून गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली आणि त्यांच रेड्याला मारत असल्याचं दिसून आलं आणि पाय बांधत असल्याचं देखील दिसलं.
त्याचबरोबर अत्याचार करणाऱ्याने सीसीटीव्ही कॅमेरे काढून नेल्याचंही दिसलं. 18 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर या कालावधीत तीन वेळा हा प्रकार घडला होता. यात चौहाण यांनेच हा प्रकार केल्याचं समोर आलं आणि मालकाने थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर चौहाण याला पोलिसांत बोलावून घेण्यात आलं आणि त्यानेदेखील अनैसर्गिक कृत्य केल्याचं मान्य केलं. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
यापूर्वीही असाच प्रकार उघड...
यापूर्वीदेखील पुण्यात असा प्रकार समोर आला होता. पुण्यातील नदीपात्रात एका रेड्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आलं होतं. त्यावेळी रेड्याच्या आवाजामुळे आणि कणण्यामुळे हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला होता. त्यावेळी डेक्कन पोलिसांनी लगेच कारवाई करत एकाला अटक केली होती आणि रेड्यावर लगेच उपचारदेखील सुरु करण्यात आले होते.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
