एक्स्प्लोर

Pune Crime News : सहकारी महिलेवर बलात्कार, नराधमाला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा; अखेर 13 वर्षांनी मिळाला न्याय

पुण्यात सध्या लैंगिक छळाच्या आणि बलात्काराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धमकावून पैसे उकळून सहकारी महिलेवर बलात्कार करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

Pune Crime News : पुण्यात सध्या लैंगिक छळाच्या आणि बलात्काराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धमकावून, पैसे उकळून सहकारी महिलेवर बलात्कार करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. इस्माईल अब्दुल रहेमान करजगी असे शिक्षा झालेल्याचं नाव आहे. या आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

ज्युनियर सहकारी असणाऱ्या महिलेवर या  इस्माईल करजगी याने अनेकदा धमकवलं होतं आणि तिच्यावर बलात्कार केला होता. दोघेही  एकाच कंपनीमध्ये 2010 मध्ये नोकरीला होते. या कंपनीत करगजी हा त्या महिलेचा सिनियर सहकारी होता. त्याने  तरुणीकडे उसने पैसे मागितले होते. या तरुणीने पैसेही दिले. त्याची एक मैत्रिण सिंहगड रोड येथील सदनिकेवर येणार आहे, तू पण चल असे खोटे बोलून तिला तो घेऊन गेला. तेथे कोणीही नव्हते. तिथे आरोपीने पीडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून, धमकावून तिच्यावर बलात्कार केला.

पतीला पाठवला मेल

काही दिवसांनी या तरुणीचं लग्न झालं, त्यानंतर आरोपीने तरुणीच्या पतीला ऑफिसमधून मेल पाठवला.  त्यात ऑफिसमधील एका कार्यक्रमाचा फोटो पाठवला. त्यात त्याने ‘‘ये तो अभी शुरुवात है, अभी तो बहुत फोटो और व्हिडीओ बाकी है’’ असे म्हटले आणि पैशांची मागणी केली होती. त्यानंतर पतीने तरुणीला या सगळ्या प्रकाराबाबत विचारलं. ब्लॅकमेक करतो, धमक्या देतो, कुटुंबीयांना मारुन टाकण्याच्या धमक्या देतो, पीडित महिलेच्या बहिणीचे लग्न ठरलेले असताना तिचे लग्न होऊ देणार नाही, असे धमक्या देत असल्याने घाबरुन हा प्रकार सांगितला नसल्याचे पतीला सांगितले. त्यानंतर पतीनेच या सगळ्या प्रकारासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित तरुणीचा पती हा प्रकार समजल्यावर तिच्या पाठीशी उभा राहिला. दरम्यान हा खटला रेंगाळला. खटल्याची सुनावणी सुरु झाली तेव्हा पीडितेचा पती अमेरिकेत होता. त्याने तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविली होती. 

13 वर्षांनी मिळाला न्याय 
हा प्रकार 2010 मध्ये घडला होता. त्यानंतर अनेक दिवसांनी तक्रार दाखल केली होती. त्यादरम्यान हा खटला चांगलाच लांबला, मात्र नराधमाला शिक्षा झालीच. अशाच प्रकारे बलात्कार करणाऱ्या नराधमाला शिक्ष झाली पाहिजे, अशा भावना सर्व स्तरावरुन उमटत आहे. मात्र शिक्षा होण्यासाठी एवढा काळ लागू नये,असंही अनेकांचं मत आहे. 

संबंधित बातमी:

Pune Crime : गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या हैवान शिक्षकाला लैंगिक शोषण प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
Embed widget