एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?

Pune Crime News: दोन दिवसांपुर्वी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अल्पवयीन मुली, महिला इतकंच नाही तर वृध्द महिलांसोबत देखील लैंगिक अत्याचार घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच शिक्षणाचं माहेरघर आणि रांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात देखील गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपुर्वी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. 24) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये पीडित तरुणी शिक्षण घेते. तर आररोपी देखील याच महाविद्यालयात 11वी,12वीचे शिक्षण घेत आहेत. त्यातील एकाने पीडितेला पार्टीसाठी म्हणून आरोपींपैकी एकाच्या फ्लॅटवर नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी ड्रगचे सेवन केले आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन मुलीवर चाबलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.  कोरेगाव पार्क पोलिसांकडून या प्रकरणी पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील दोन तरुण अल्पवयीन आहेत. पीडित तरुणी ही कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या "गुड टच बॅड टच" या उपक्रमातून ही घटना समोर आली आहे.   

हा संपूर्ण प्रकार एप्रिल पासून घडत आला आहे. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोन वरून सोशल मीडिया वापरत होती आणि यावरूनच आरोपी तरुणांशी तिची मैत्री झाली. त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला. या संबधीचे व्हिडिओ देखील आरोपींनी काढल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी तरुण हे एकमेकांना ओळखत नाहीत. पिडीत तरुणीला भेटण्यासाठी एकाने तिच्यावर महाविद्यालयात अत्याचार केले, तर दुसऱ्याने तिच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतर 2 तरुणांनी सुद्धा तिच्याशी अनेक ठिकाणी सबंध ठेवल्याची माहिती आहे. ही सर्व घटना पिडीत तरुणीने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच बॅड टच अभियानात असलेल्या समुपदेशक यांना सांगितल्या. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पालकांनी पोलिसात धाव घेतली. तर या प्रकरणात ड्रग्जचा काही संबध आला नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

या घटनेप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

ही घटना समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आमि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहून संताप व्यक्त करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केले आहेत. "कोरेगाव पार्कमध्ये अल्पवयीन मुलांनी केलेल्या ड्रग्जपार्टीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची बातमी वाचली. ही अतिशय धक्कादायक आणि पुणे पोलीसांच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना आहे. अकरावी-बारावीच्या मुलांना नशा करण्यासाठी ड्रग्ज उपलब्ध होते, ही बाब अतिशय चिंताजनक आहे. सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे या प्रकरणी महाविद्यालयाचे विश्वस्त आणि पोलीस प्रशासनाने घेतलेली बोटचेपी भूमिका.... ! ज्यांनी कायद्याचे रक्षण केले पाहिजे, नव्या पिढीला शिस्त लावण्याचे काम केले पाहिजे तेच अशी गंभीर प्रकरणे दडपण्याचे काम करतात हे महाराष्ट्र पोलीस आणि शिक्षण क्षेत्राच्या लौकीकाला साजेसे नाही,", अशी पोस्ट सुप्रिया सुळेंनी शेअर केली आहे. 

या घटनेप्रकरणी आमदार रविंद्र धंगेकरांनी लिहलं पत्र

या संतापजनक घटनेप्रकरणी काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त करत पत्र लिहलं आहे. "कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक प्रकरणातील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु दरवेळेला अश्या घटनांना गुन्हेगारां इतकेच या व्यवस्थेतील घटक देखील जबाबदार असतात. आजच्या या घटनेतील सर्व माहिती माझ्या पत्रात मांडली आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना व पुणे शहराच्या पालकमंत्र्यांना ही विनंती राहील की आपण देखील या घटनेकडे तितक्याच गांभीर्याने पाहत घटनेतील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला इतके कठोर शासन करावे की पुन्हा कोणीही आशा प्रकारचे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही," असं धंगेकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
×
Embed widget