एक्स्प्लोर
पुण्यात मुलीची लग्नपत्रिका द्यायला जाताना आई-वडिलांचा अपघाती मृत्यू
वंदना अवचरे आणि संपत अवचरे असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.
पुणे : मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका द्यायला चाललेल्या दाम्पत्याचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. पुण्यातील घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे-सासवड रोडवर उरुळी देवाची भागात हा अपघात घडला.
वंदना अवचरे आणि संपत अवचरे असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. अवचरेंच्या मुलीचं 17 डिसेंबर रोजी लग्न आहे. दोघेही आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी वडकीतील नातेवाईकांकडे दुचाकीवरुन जात होते.
सासवड-हडपसर रस्त्यावर असताना मागून आलेल्या डंपरनं अवचरेंच्या दुचाकीला धडक दिली. डंपरच्या चाकाखाली आल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
आरोपी डंपरचालकावर लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या तोंडावर घडलेल्या घटनेमुळे सर्वांच्या काळजाला चटका लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement