Puja Khedkar: मोठी बातमी : पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अखेर मोठं पाऊल उचललं, पूजा खेडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा!
Puja Khedkar:पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पुजा खेडकरवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.
Puja Khedkar: राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पुजा खेडकरवर (Pooja Khedkar) अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार पुजा खेडकरनी (Pooja Khedkar) पोलिसांना दिली आहे आणि यूपीएससीकडे देखील तशी तक्रार केली होती. पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीत सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा पुजा खेडकरचा आरोप आहे. दरम्यान या आरोपांबाबत चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांनी तीन वेळा समन्स बजवून देखील पूजा खेडकर हजर झालेली नाही.
पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. पूजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्या विरोधात वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली. दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचे पूजा खेडकरनी आरोप केले होते. वाशिम पोलिसांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा खेडकरची तक्रार नोंदवून घेतली. मात्र दिवसे यांच्याविरोधातील तक्रार वाशिम पोलीसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला या तक्रारीसंदर्भात काही चौकशीसाठी तब्बल तीन वेळा समन्स पाठवून देखील ती गैरहजर राहिली होती.
तीनदा समन्स बजावूनही पूजा खेडकर जबाब नोंदवण्यास गैरहजर
जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Pooja Khedkar) यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार प्रकरणात प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर तीनदा समन्स बजावूनही पुणे पोलिसांसमोर हजर झाली नाही. पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध वाशिममध्ये छळवणुकीची तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने खेडकरला पुणे पोलिसांकडे जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते.
पुणे पोलिसांनी तिला दोनदा समन्स बजाविले होते. त्यावेळी खेडकरनी (Pooja Khedkar) पोलिसांकडे काही अवधी मागितला होता. आठवडाभरानंतर पूजा खेडकर पोलिसांसमोर हजर झाली नाही. जबाब नोंदविण्यास उपस्थित रहावे, असे समन्स पोलिसांनी तिला पुन्हा बजावण्यात आले होते. तीनदा समन्स बजावूनही ती हजर झाली नाही. खेडेकरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तिचा मोबाइल क्रमांक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर आता दिल्ली पोलिस देखील पूजा खेडकरचा शोध घेत आहेत.
पूजा खेडकर नातेवाईकांच्या घरी लपून बसली की दुबईला पळून गेली?
यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दणका दिला आहे. पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे.
पूजा खेडकरचा (Pooja Khedkar) न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ती भारतातून थेट परदेशात पसार झाली असावी, अशी शक्यता अनेक वृत्तपत्रांमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पूजा खेडकर (Pooja Khedkar) वरती अनेक आरोप करण्यात आले आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्गातून पूजाने खेडकरने 12 वेळा UPSC परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.