एक्स्प्लोर
'एअर विस्तारा'च्या हवाईसुंदरीची छेड, पुण्यातील वृद्धाला अटक
दिल्लीमध्ये विमानाचं लॅण्डिंग झाल्यानंतर बाहेर पडताना राजीव यांनी जाणूनबुजून क्रू मेम्बरला स्पर्श केल्याचा आरोप आहे.
पुणे : 'एअर विस्तारा' कंपनीच्या विमानात एका वृद्धाने एअरहॉस्टेसची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्याच्या 62 वर्षीय उद्योजकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लखनौ-दिल्ली विमान प्रवासात ही घटना घडली.
एअरहॉस्टेसने 24 मार्चला ही घटना घडल्याची तक्रार दिली होती. त्याच दिवशी कारवाई करत पोलिसांनी राजीव वसंत दानी यांना दिल्ली पोलिसांनी विमानतळावरच अटक केली. दिल्लीमध्ये विमानाचं लॅण्डिंग झाल्यानंतर बाहेर पडताना राजीव यांनी जाणूनबुजून क्रू मेम्बरला स्पर्श केल्याचा आरोप आहे.
'एअर विस्ताराच्या लखनौ–दिल्ली विमान UK997 मध्ये एका प्रवाशाने क्रू मेंबरची छेड काढली. एखाद्या प्रवाशाकडून आमचे कर्मचारी किंवा सहप्रवाशांना अवमानास्पद वागणूक मिळत असेल किंवा त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल, तर एअर विस्तारा अशाप्रकारचं वर्तन कदापि सहन करत नाही.' असं एअर विस्ताराच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं.
या प्रकरणी एफआयआर दाखल झाला असून पोलिस तपास सुरु आहे. संबधित प्रशासनाला आम्ही पूर्ण सहकार्य करु, असंही एअर विस्ताराच्या वतीने सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement