एक्स्प्लोर

गेले डीएसके कुणीकडे? अटक टाळण्यासाठी सपत्नीक गायब

डीएसकेंचा ठावठिकाणा शोधण्याचं काम आता पुणे पोलिस करत आहेत. पण पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात नसल्याचा आरोप गुंतवणूकदार करत आहेत.

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पत्नीसह परागंदा झाले आहेत. अटक टाळण्यासाठी डीएसके अज्ञातस्थळी गेल्याची माहिती आहे. डीएसकेंचा ठावठिकाणा शोधण्याचं काम आता पुणे पोलिस करत आहेत. पण पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात नसल्याचा आरोप गुंतवणूकदार करत आहेत. उच्च न्यायालयाने डीएसकेंना 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. यासाठी त्यांना दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र डीएसकेंनी पैसे न भरल्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर डीएसकेंसमोर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयाला हिवाळी सुट्टी असल्यामुळे डीएसकेंसमोरचा तो मार्गही बंद झाला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. २०१४ पासून अनेकांनी घर बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. २०१४ पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली. स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. १९ डिसेंबर २०१४ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला. सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली. इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे. अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले. सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं. मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली डीएसकेंच्या वीसहून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचे पगारही थकले आहेत. स्वतः डीएसके आणि त्यांच्या पत्नी ही परिस्थिती मान्य करतात. मात्र सगळं खापर नशिबावर फोडतात. आर्थिक मंदी आणि नोटबंदीमुळे अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं आहे. आपणही त्यामुळेच अडचणीत आल्याचा दावा डीएसके करत आहेत. संबंधित बातम्या : कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी! बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी! शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला!
PMC Election 2026 : पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
Embed widget