एक्स्प्लोर
प्रेयसीच्या घराबाहेर स्फोट, पुण्यात प्रियकराचं सूडनाट्य
दगाबाजी करणाऱ्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी पुण्यातील प्रियकराने तिच्या घराबाहेर बॉम्ब फोडला.

पुणे : प्रेमात दगा देणाऱ्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने तिच्या घराबाहेर स्फोट घडवला. पुण्यातील धायरी भागातील आलोक पार्क सोसायटीत ही घटना घडली. प्रेमात सूड घेण्यासाठी एखादी व्यक्ती कुठल्या थराला जाईल, याचा नेम नाही. दगाबाजी करणाऱ्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी पुण्यातील प्रियकराने बॉम्ब फोडला. धायरी भागातील परिसर बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या स्फोटाच्या आवाजाने हादरला होता. या आवाजाच्या हादऱ्यामुळे एका घराच्या खिडकीची काचही फुटली होती. स्फोटाचं गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी प्रियकरानेच हा स्फोट घडवल्याचं समोर आलं. सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी 20 वर्षीय किशोर आत्माराम मोडक आणि 24 वर्षीय अक्षय राजाभाऊ सोमवंशी या दोघा आरोपींना अटक केली आहे.
आणखी वाचा























