एक्स्प्लोर

'आय लव्ह यू, एवढी बीझी झालीस का', सततच्या मेसेजला कंटाळली; पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल !

पुण्यातील भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीने पेटवून घेत स्वत:ला संपवलं आहे.

पुणे : भारती विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण  घेणाऱ्य एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने पेटवून घेत स्वत:ला संपवल्याची (Pune Student Suicide) धक्कादायक घटना घडली आहे. वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला तसेच आपल्या रुममेटच्या त्रासाला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचचलल्याचं म्हटलं जातंय. 7 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर या विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. 

कर्मचारी, विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल 

विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत मात्र महाविद्यालय प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मिळालेल्या रेणुका बालाजी साळुंखे (वय 19) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. या विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्येप्रकरणी वसतीगृहाच्या उपहारगृहात काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि वसतीगृहातचराहणारी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू  (वय 19) या विद्यार्थिनीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी धोंडीबा साळुंखे  यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

दाखल तक्रारीनुसार मृत विद्यार्थिनी ही बालाजी साळुंखे यांची मुलगी आहे. ती भारतीय विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होती. याच वसतीगृहात काम करणारा सतिश जाधव नावाचा कर्मचारी  रेणुकाला 'आय लव्ह यू' म्हणजेच माझे तुझ्यावर प्रेम आहे, अशा प्रकारचे मेसेज सतत पाठवायचा. मृत विद्यार्थिनी समोर दिसताच 'तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले,' असे म्हणत सतिश तिला त्रास द्यायचा. या प्रकारामुळे रेणूका घाबरली होती. यासह तिच्या खोलीत राहणारी मुस्कान सिद्धू नावाची मुलगीही तिला अभ्यास करू देत नव्हती. ती सतत खोलीचे लाईट्स बंद करायची.  

स्वच्छतागृहात स्वत:ला पेटवून घेतलं


या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेणुकाने अखेर वसतीगृहातील स्वच्छतागृहात ७ मार्चच्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्वतःला पेटवून घेतले होते. पुण्यातीलच सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू होते. उपचार चालू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Ajit Pawar and Jay Pawar: अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच शेवटी त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
Ajit Pawar Birth Anniversary: अजित पवारांची पहिली शासकीय जयंती; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी, पिंपरी पालिकेत नेमकं काय घडलं?
अजित पवारांची पहिली शासकीय जयंती; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी, पिंपरी पालिकेत नेमकं काय घडलं?
Rajendra Pawar : लाल दिव्याच्या गाड्या, पोहणं, फुफाट्यात लोळणं, घाबरवणं, रोहित दोन महिन्यांचा असताना....; अजितदादांसोबत जगलेलं बालपण ते आत्तापर्यंतचा काळ राजेंद्र पवारांनी सांगितला
लाल दिव्याच्या गाड्या, पोहणं, फुफाट्यात लोळणं, घाबरवणं, रोहित दोन महिन्यांचा असताना....; अजितदादांसोबत जगलेलं बालपण ते आत्तापर्यंतचा काळ राजेंद्र पवारांनी सांगितला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget