एक्स्प्लोर

Pune news : शेतात गारांचा खच अन् किर्र अंधार... मोबाईलच्या टॉर्चमध्ये विवेक वळसे पाटलांनी केली पिकाची पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील पोहचले होते. ते ज्यावेळी पाहणी करण्यासाठी पोहचले त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता.

Pune News :  राज्यात मागील काही दिवसांपासून (Pune News ) अवकाळी (Unseasonal Rain) पावसानं थैमान घातलं आहे. पुणे जिल्ह्यातही मागील काही दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील पोहचले होते. ते ज्यावेळी पाहणी करण्यासाठी पोहचले त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी त्यांनी कसलीही तमा न बाळगता  मोबाईलच्या उजेडात शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. 

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावांना शनिवारी सायंकाळी गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला. गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचं सर्व पीक आडवं झालं आहे. शेतात गारांचा खच पडला होता. काही वेळातच सुपारी आणि लिंबाच्या आकाराएवढ्या मोठ्या गारा पडू लागल्या. गारांचा खच तयार झाला. पोंदेवाडी, खडकवाडी, जारकरवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा, द्रोणागिरीमळा, लाखणगाव, ज्ञानेश्वरवस्ती या परिसरात गारांमुळे कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले कांदा पिकांचे त्याचबरोबर मिरची, कलिंगड, फ्लावर, काकडी, भुईमुग, गहू या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना दिला धीर

अवकाळी पाऊस आणि गारांचा मोठा पडलेला खच पाहून शेतकरी हवालदिल झाले होते. या सगळ्या परिस्थितीत धीर देण्यासाठी विवेक वळसे पाटील गेले होते. त्यांनी या सगळ्या शेतकऱ्य़ांना धीर देण्याचं काम केलं. त्यासोबतच लवकरात लवकर पंचनामा करु, असं आश्वासनदेखील त्यांनी दिलं. 

पिकाचं आणि फळांचं मोठं नुकसान

या सगळ्या गारपिटीत कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले, कांदा पिकांचे त्याचबरोबर मिरची, कलिंगड, फ्लावर, काकडी, भुईमुग, गहू या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. 

बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

बारामती तालुक्यातील बहुसंख्य ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. बारामतीसाह इंदापूर, दौंड तालुक्यात काही ठिकाणी पाऊस सुरु होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढण्यास आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पिंपरी चिंचवड, सातारा, धुळे, वर्धा या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
Embed widget