Pune Accident News: अंत्यविधीवरून परतणाऱ्या अनेक नागरिकांना भरधाव ट्रकनं चिरडलं; लहान मुलासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण जखमी
Pune Accident News: पुण्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने तीन दुचाकी स्वरांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Accident News: पुण्यातून भीषण अपघाताची (Accident News) बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने अनेकांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. अंत्यविधी करून माघारी परतणाऱ्या अनेक नागरिकांना ट्रकने चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात (Accident News) तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एक महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. तर 10 ते 12 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
जखमींना उपचारांसाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात करण्यात आले आहे. अंत्यविधी उरकून नागरिक माघारी फिरले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात (Accident News) 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या आधिक माहितीनुसार, आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आज (ता.19) सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारस मौजे गुळुंचवाडी या ठिकाणी अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. गावातील मयत भांबीरे यांचा अंत्यविधी करून गावातील अनेक नागरीक आणि नातेवाईक कल्याण-नगर रोडने जात असताना नगर-कल्याण रोडने नगर बाजूकडून बेल्हे बाजूकडे येणाऱ्या 12 टायर ट्रकने रोडवरून पायी चालणाऱ्यांना चिरडलं. त्यामध्ये 1 महिला, 1 पुरुष, 1 लहान मुलगा या तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा अधिक तपास करत आहेत.
कल्याण-अहमदनगर महामार्गावर हा भीषण अपघात (Accident News) झाला. भरधाव वेगात आलेल्या अवजड ट्रकने अनेकांना चिरडलं आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले. चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत आधी दुचाकीस्वारांना चिरडलं त्यानंतर अंत्यसंस्कार विधी पुर्ण करून घरी परतणाऱ्या नागरिकांना चिरडलं. त्याचबरोबर चारचाकी वाहनांना देखील धडक दिली आहे. यामुळं जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये 1 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साडे अकराच्या सुमारास हा अपघात (Accident News) झाला आहे. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी बराच वेळ महामार्ग रोखून धरला होता. या ठिकाणी बायपास करावा या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानं ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणा पाहून स्थानिक संतप्त झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे.