एक्स्प्लोर

Pune Helicopter Crash: पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश; खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती

Pune News: पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती

पुणे:  पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश (Pune Helicopter Crash) झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर कोणाचं आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. यामध्ये 4 प्रवासी होते, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे, तर अद्याप त्या प्रवाशांबाबतची माहिती समजू शकलेली नाही.

ही दुर्घटना अत्यंत भीषण आहे. पौड जवळच असलेल्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये (Pune Helicopter Crash) पायलटसोबतच 4 जण असल्याची माहिती आहे, ते यामध्ये जखमी झाले आहेत. या घटनेचं वृत्त समजताच परिसरात मोठी गर्दी झाली आहे. त्यातील २ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. 

बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचते आहे, पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत, या घटनेनंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली, दरम्यान ही दुर्घटना कशी घडली यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पावसामुळे आणि खराब हवामानामुळे घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तर या हेलिकॉप्टरमध्ये (Pune Helicopter Crash) काही तांत्रिक बिघाड झाला होता का यांचा तपास करण्यात येईल. 

घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती

हेलिकॉप्टर (Pune Helicopter Crash) काही वेळ घोटावड्याच्या दिशेने आकाशात घिरट्या घालत होतं. अचानक ते खाली पडल्याचा मोठा आवाज आला. त्यामध्ये चार जण होते, 2 जण गंभीर जखमी आहेत. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक आणि आजुबाजूचे लोक मदतीसाठी आले आहे, पायलट बोलण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेलं जाईल. त्या ठिकाणी 200-300 ग्रामस्थ  घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या आजूबाजुला न जाण्याचं आवाहन पायलटनी नागरिकांना केलं आहे. कारण या हेलिकॉप्टरचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेलिकॉप्टर चे नाव- AW 139
हेलिकॉप्टर मधील व्यक्ती-
1) आनंद कॅप्टन (जखमी) हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आली आहे
2) दिर भाटिया (प्रकृती स्थिर)
3) अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर)
4) एस पी राम (प्रकृती स्थिर)

हेलिकॉप्टरची कंपनी- ग्लोबल हेक्ट्रा

क्रॅश झालेलं हेलिकॉप्टर जुहू मुंबई येथून हैदराबादला जात होतं.

VIDEO- पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं

 

 

महत्त्वाच्या बातम्या

NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Embed widget