एक्स्प्लोर

Pune  PMPML News : PMPMLच्या सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई; तब्बल 36 कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन

PMPML Employees Suspended : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने वारंवार गैरहजर राहिलेल्या 36 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे.

Pune News : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने आता आपल्या कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल 36 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. याशिवाय, पीएमपीएमएलचे नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) सचिंद्र प्रताप सिंग यांनीही याच मुद्द्यावरून तीन कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश जारी केले आहेत.

वारंवार गैरहजर राहणाऱ्या PMPML कर्मचाऱ्यांवर कारवाई

पीएमपीएमएलच्या म्हणण्यानुसार, सीएमडीने 30 कंडक्टर आणि 6 ड्रायव्हरसह 36 कर्मचार्‍यांचे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत जे यापूर्वी अनेक प्रसंगी ड्युटीवर गैरहजर राहिले आहेत. या कारवाईनंतर दोन चालक आणि वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यासह तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय 22 जुलै रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्याबद्दल 78 कंडक्टर आणि 64 ड्रायव्हरसह 142 कर्मचाऱ्यांना नोटिसाही बजावल्या आहेत.

तब्बल 36 कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन

"पीएमपीएमएलच्या जास्तीत जास्त बस रस्त्यावर धावतील, प्रवाशांना कमी गैरसोयीचा सामना करावा लागेल, कर्मचाऱ्यांची गैरहजरी कमी व्हावी यासाठी आणि पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे", असं पीएमपीएमएलने एका निवेदनात म्हटले आहे.

पीएमपीएमएलचा 'प्रवासी दिवस' उपक्रम

पीएमपीएमएलने नुकताच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी प्रत्येक डेपोमध्ये नागरिकांकडून प्रतिक्रिया आणि तक्रारी गोळा करण्यासाठी 'प्रवासी दिवस' हा उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय, पीएमपीएमएल आगारातील अधिकाऱ्यांना सकाळी 8 ते 11 या वेळेत बसमधून प्रवास करण्याचे आणि दर शनिवारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सकाळी 5 ते 8 या वेळेत सुविधांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चालक अन् वाहकांची 'या' नंबरवर तक्रार करा 

पुणे PMPML च्या अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यातच चालकांचा किंवा कंडक्टरच्या तक्रारीदेखील अनेक नागरिक करत असतात. याच सगळ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रायव्हेट लिमिटेड (PMPML) ने चालक आणि वाहकांच्या चुकीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. अशा ड्रायव्हर किंवा कंडक्टरची पुराव्यानिशी तक्रार करणाऱ्या नागरिकांना ट्रान्सपोर्ट युटिलिटी आता 100 रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. प्रवासी तक्रारी @ppml.org वर किंवा 9881495589 वर व्हॉट्सअॅपवर बस क्रमांक, मार्ग, स्थळ, घटनेची तारीख आणि वेळ पाठवू शकतात आणि अशा तक्रारी पुराव्यासह जवळच्या डेपोतही सादर करता येतील.

हेही वाचा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावेAmitabh Bachchan Apology : मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार, अमिताभ बच्चन यांनी माफी मागितलीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 21 September 2023 : ABP MajhaTop 70 : सातच्या 70 बातम्या! वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
Kisan Rail : बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
Amit Shah : अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
Embed widget