एक्स्प्लोर
पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या
स्वप्नील देशमुख मित्र विशाल शेळकेसोबत सिंहगड परिसरात फिरायला गेला होता. डोणजेगावातल्या एका हॉटेलमध्ये स्वप्निल जेवणासाठी थांबला होता.

पुणे : पुण्यात 32 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. कर्वेनगरजवळच्या डोणजे गावात स्वप्निल देशमुखची हत्या करण्यात आली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या स्वप्निलचा पूर्ववैमनस्यातून काटा काढल्याची माहिती आहे. सोमवारी संध्याकाळी स्वप्नील देशमुख मित्र विशाल शेळकेसोबत सिंहगड परिसरात फिरायला गेला होता. डोणजे गावातल्या एका हॉटेलमध्ये स्वप्निल जेवणासाठी थांबला होता. त्याचवेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 8 जणांनी स्वप्निलवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या स्वप्निलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांआधीच त्याचा मृत्यू झाला. स्वप्निलवरही खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत पसरवणे असे 15 गुन्हे दाखल होते. त्यामुळे ही हत्या वर्चस्ववादातून झाल्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























