एक्स्प्लोर

Prakash Amte News: डॉ. प्रकाश आमटे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल; अनिकेत आमटेंची माहिती

जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांंना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती नीट होती. मात्र आज त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Prakash Amte News: जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांंना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती नीट होती. मात्र आज त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. पाच दिवस झाले प्रकाश आमटेंचं इन्फेक्शन वाढलं आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे.त्यामुळे त्यांना आराम करायची संधी द्या आणि भेटायला येऊ नका, असं आवाहन अनिकेत यांनी केले आहे.

फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलंय?

"बाबांना काल परत admit केले आहे. आता सर्व visitors ना पूर्ण प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. बाबांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि high fever आहे. आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही असेल अपडेट ते सोशल मीडिया वर टाकत जाईन. कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये. योग्य उपचार सुरू आहेत. माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा. Dinanath Mangeshkar Hospital Pune येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह मुळीच करू नये. बरे झाल्यावर नक्की भेटायला यावे हेमलकसाला.", अशी पोस्ट करत त्यांनी प्रकाश आमटेंच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

जंगली प्राणी आणि माणूस यांच्यात वेगळं नातं जपणारं ठिकाण म्हणून त्यांचं 'आमटे आर्क' प्रसिद्ध आहे. सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ (Ramon Magsaysay) हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे  यांना देण्यात आला आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत 9 जणांचा जीव गेल्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांना जाग; पर्यावरण विभाग अन् कंत्राटदाराला नोटीस!
मोशी दुर्घटनेत 9 जणांचा जीव गेल्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांना जाग; पर्यावरण विभाग अन् कंत्राटदाराला नोटीस!
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Pune Moshi Building Collapse: 'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न

Embed widget