पूजा खेडकरांच्या अडचणी संपता संपेना! अपंगत्व प्रमाणपत्र खोटं? माझाच्या हाती एक्स्क्लुझिव्ह कागदपत्रं
Pooja Khedkar: अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपीस्टने तपासणी दरम्यान जे नमूद केलं, ती कागदपत्रे एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.
पुणे : वादग्रस्त आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकरांना (Pooja Khedkar) दिलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट आहे का? अशी शंका उपस्थित करणारी, किंबहुना त्यावर शिक्कामोर्तब करणारी कागदपत्रे एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. ज्यांच्या सहीने हे अपंगत्वाचे प्रमाणपत्र पूजा खेडकरांना देण्यात आलंय. ते वायसीएमचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळे यांची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र त्यांनी हे अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट नाही असा दावा केलेला आहे. परंतु अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपीस्टने तपासणी दरम्यान जे नमूद केलं, ती कागदपत्रे एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. यात ऑर्थोची तपासणी शिकाऊ डॉक्टरांनी कशी काय केली? तर तपासणीवेळी फिजिओथेरपीस्टना डाव्या गुडघ्यात इजा आढळलीचं नाही, तरी अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे काय दिले? असे प्रश्न या कागदपत्रांमुळं उपस्थित झालेत.
जा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच त्यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचेही आता धाबे दणाणले आहेत. कारण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपीस्टने तपासणी दरम्यान जे नमूद केलं, ती कागदपत्रे एबीपी माझाच्या हाती लागलीत.
पूजा खेडकरांच्या तपासणीतून कोणते प्रश्न उपस्थित होतात?
- ऑर्थोपेडिक विभागाच्या शिकाऊ डॉक्टरांनी (SIB SR) अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी तपासणी कशी काय केली?
- पूजा खेडकरांच्या म्हणण्यानुसार 2018 मध्ये डाव्या गुडघ्याच्या गादीला (दोन हाडांना जोडणारा भाग ) इजा होती, मात्र त्यावेळचा पुरावा डॉक्टरांनी का मागितला नाही?
- त्यावेळी ऑपरेशन झालं होतं, म्हणजे वैद्यकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार ते काही महिन्यांमध्ये कायमस्वरूपी बरं झालं असणार.
- अशाप्रसंगी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी एमआरआय रिपोर्ट का घेतला नाही?
- शिकाऊ डॉक्टरांनी केवळ हाताने डाव्या गुडघ्याची तपासणी केली अन पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के आधु असतील, असा सकारात्मक (पॉझिटिव्ह) अहवाल कसा काय दिला?
- मात्र फिजिओथेरपीस्टच्या तपासणीत डाव्या गुडघ्यात कोणती ही इजा आढळली नाही.
- चालताना तिरका पाय पडत नाही अथवा कोणता त्रास होत असल्याचं ही आढळलं नाही.
फिजिओथेरपीस्टने नकारात्मक अहवाल दिला असताना मग अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे काय दिले? - दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने वायसीएमच्या खोट्या अपंगत्वाच्या आधारे पूजा खेडकर शासकीय सेवेत दाखल झाल्यात का? ही घेतलेली शंका उपस्थित झालेल्या या प्रश्नांनी खरी ठरताना दिसते.
- मात्र तरी ही वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंनी हे अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट नाही, हा दावा कशाच्या आधारे केला?
हे ही वाचा :