एक्स्प्लोर

Pune Sangita Daware : मंत्रालयासमोर विषप्राशन करणाऱ्या पोलीस पत्नी संगीत डावरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Pune Sangita Daware : मंत्रालयासमोर विषप्राशन करून (Suicide) आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसपत्नी संगीता डवरे यांची मृत्यूची झूंज अपयशी ठरली आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते

Pune Sangita Daware : मंत्रालयासमोर विषप्राशन करुन (Suicide) आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसपत्नी संगीता डवरे यांची मृत्यूची झूंज अपयशी ठरली आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई करा, अशी तक्रार संगीता यांनी केली होती. मात्र या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांनी थेट मंत्रायलासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यावेळी पामबीच मार्गावर लावलेल्या नाकाबंदीच्या वेळी भरधाव इनोव्हा कारने थेट बॅरिगेट्स तोडले होते. याच भरधाव गाडीखाली संगीता यांचे पती चिरडले गेले होते. या भीषण अपघातात संगीता यांचे पती गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाल होती. कार चालक हा मद्यप्राशन करुन होता. त्यामुळे कारचालकावर कठोर कारवाई व्हायला हवी होती. मात्र त्याप्रमाणे कारचालकावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही.

नेरुळ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात गंभीरता दाखवली नाही आणि कारचालकाला सोडून दिलं. संगीता यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करा यासाठी संगीता यांनी मोठ्या अधिकाऱ्यांकडे चकरा मारल्या. त्यांनी या प्रकरणावर फार लक्ष दिलं नाही त्यानंतर संगीता यांनी राज्य सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. पती काम करत असलेल्या पोलीस विभागाकडूनच न्याय मिळत नाही हे पाहून त्यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यालाही सरकारने गंभीर घेतलं नाही. त्यामुळे अखेर त्यांनी मंत्र्यालयासमोर जाऊन विषप्राशन केलं. 

वर्षभरानंतरही संगीता यांचे पती आजारी

त्यांचा झालेल्या अपघातातून पती हनुमंत डवरे अजूनही सावरले नाही आहेत. या अपघातात त्यांच्या हातापायांना गंभीर इजा झाली होती. त्यावर योग्य उपचार न झाल्याने अपघात होऊन वर्ष उलटल्यानंतरही त्यांना चालता येत नाही. शिवाय आतापर्यंतच्या त्यांच्या उपचाराचे पैसेदेखील त्यांनीच दिले आहेत. बिलाची फाईल अजूनही पोलीस दलाने मंजूर केली नसल्याचा आरोप संगीता यांनी केला आहे. त्यामुळे संगीता आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यांनी इशारा देऊनही गांभीर्य लक्षात न घेतल्याने आज त्यांचा जीव गेला आहे. पोलिसांच्या पत्नीलाच न्याय मिळाला नसल्याने अनेक स्तरावरुन संताप व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget