एक्स्प्लोर

कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला दांडिया खेळण्यास विरोध

यंदाच जानेवारीपासून ऐश्वर्या आणि समाजातील तरुण-तरुणींनी कौमार्य चाचणी विरोधात एल्गार उभा केलाय. सोशल मिडियावर 'Stop The "V"Ritual' या नावाने ग्रुप तयार करुन, हे तरुण-तरुणी एकवटलेत.

पिंपरी (पुणे) : कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तमायचीकर यांना दांडिया खेळण्यास विरोध झाल्याचा प्रकार पिंपरीत घडला. ऐश्वर्या दांडिया खेळायला आल्याने खेळच बंद करण्यात आला. पिंपरीतल्या भाटनगर येथे हा प्रकार घडला. खराडीत राहणारी ऐश्वर्या माहेरी आली म्हणून काल भाटनगरमधील देवीच्या दर्शनासाठी गेली होती. तेव्हा ती इतर महिलांसोबत दांडिया खेळू लागली. मात्र मंडळाने हे पाहताच दांडिया खेळ बंद केला आणि डीजे सुरु केला व केवळ तिथे उपस्थित तरुण डीजेवर नाचू लागले. ऐश्वर्या काही वेळ तिथेच थांबून राहिली. मग एका मैत्रिणीला तिने बोलावले. मैत्रिणीला तिथेच थांबवून ती पिंपरी पोलीस चौकीत गेली. ऐश्वर्या तिथून गेल्याचं पाहताच, पुन्हा दांडिया सुरू झाल्याचे मैत्रिणीने तिला कळवलं. कौमार्य चाचणीला विरोध केल्यानेच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप ऐश्वर्याने केलाय. तसा जवाब पोलिसांना दिला असून आज दुपारपर्यंत गुन्हा दाखल होईल, अशी माहितीही ऐश्वर्याने दिली. यंदाच जानेवारीपासून ऐश्वर्या आणि समाजातील तरुण-तरुणींनी कौमार्य चाचणी विरोधात एल्गार उभा केलाय. सोशल मिडियावर 'Stop The "V"Ritual' या नावाने ग्रुप तयार करुन, हे तरुण-तरुणी एकवटलेत. मे महिन्यात ऐश्वर्याने स्वतःच्याच विवाहात कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला. तर जून महिन्यात एका विवाहातच जात पंचायतीसमोर अशी चाचणी घेऊ नये यावर जोर धरला. तेव्हा बराच गदारोळ झाला. अशा विरोधामुळे समाजाची प्रतिमा मलिन होत असल्यानेच असा अघोषित बहिष्कार 'Stop The "V"Ritual' ग्रुपवर घातला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Embed widget