एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असलेल्या पुस्तकाचं वितरण थांबवलं

सर्व शिक्षा अभियानाच्या 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी हा अपमानजनक उल्लेख आहे.

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापलेल्या पुस्ताकाचं वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण उपसंचालक विकास गरड यांनी हे आदेश दिले आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी हा अपमानजनक उल्लेख आहे.

या पुस्तकाच्या प्रती मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहेत. तसेच ज्या मजकुरावर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे.

याप्रकरणानंतर आज मराठा क्रांती मोर्चाकडून उपसंचालकांना घेराव घालण्यात आला होता. यावेळी संबधितांवर तातडीनं कारवाईची मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली.

कालच या पुस्तकाच्या लेखिका डॉ. शुभा साठे आणि पुस्तकाची प्रकाशन संस्था लाखे प्रकाशनने याबाबत माफी मागितली होती. तर या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी, पुस्तकाला सर्व शिक्षा अभियानातून त्वरित वगळण्यात यावे आणि लेखक व प्रकाशकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली.

काय आहे प्रकरण?

सर्व शिक्षा अभियानातील 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकाच्या 18 व्या पानावर संभाजी महाराजांविषयी हा अपमानजनक उल्लेख आहे. 'रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले', असा उल्लेख या पुस्तकात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget