पुण्याच्या महापौरांच्या अडचणीत वाढ; मुरलीधर मोहोळांंविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश
पुण्याचे महापौर मोहोळ(Pune Mayor Murlidhar Mohol)यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.मोहोळ यांना विचारलं असता आपण सर्व माहिती घेऊन बाजू मांडू असं त्यांनी म्हटलंय.

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुडमधील त्यांच्या प्रभागातील सार्वजनिक शौचालय ठेकेदार असलेल्या त्यांच्या भाच्याच्या मदतीने तोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोथरुडच्या भीमनगर भागातील नागरिक ते राहात असलेली जागा सोडून जावेत आणि त्याठिकाणी दुसरा गृहप्रकल्प उभारता यावा यासाठी महापौरांनी सार्वजनिक शौचालय तोडल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. देविदास ओव्हाळ नावाच्या व्यक्तीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबत विचारलं असता आपण सर्व माहिती घेऊन आपली बाजू मांडू असं त्यांनी म्हटलं आहे.























