एक्स्प्लोर
पुण्यात कस्टमने एक कोटीचे ड्रोन पकडले

पुणे : उरी हल्ल्यानंतर देशात सर्वत्र हायअलर्ट दिलेला असताना, पुण्यात तब्बल एक कोटी रुपयांचे ड्रोन पकडण्यात आले आहेत. सीमा शुल्क विभागाने तब्बल एक कोटी रुपयांचे सात ड्रोन (कस्टम) लोहगाव विमानतळावर पकडले असून, या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्या आले आहे. सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव अमित तटके असे असून यांच्याविरुद्ध सीमाशुल्क कायदा 1962 आणि दूरसंचार अधिनियमन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तटके वेबनॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यांनी कॅनडामधून येताना प्रिसीजन हॅक या कंपनीने तयार केलेले सात ड्रोन सोबत आणले होते. लोहगाव विमानतळावर त्यांच्या साहित्याच्या तपासणीदरम्यान बॅगेत सात ड्रोन आढळले. या ड्रोनची विक्री हाईट्स नेक्स्ट कंपनीचे मालक विकास कुमार यांना केली जाणार होती, असे तटकेने सीमाशुल्क विभागाला सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आता कस्टम्सकडून वेबनॉईज आणि हाईट्स नेक्स्ट या कंपन्यांमधील व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
नागपूर























