एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी ज्या विषयात लक्ष देतो, तिथे कुणीच विरोध करत नाही : शरद पवार
कृषी विज्ञान केंद्रांना केंद्र सरकारने मदत करणं आवश्यक असल्याचं सांगताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर असलेल्या आपल्या दबदब्याचीही कबुली दिली. ते म्हणाले, “आपण एखादा विषय हातात घेतल्यास त्याला कोणी विरोध करत नाही.”
बारामती : कृषी विज्ञान केंद्रांना केंद्र सरकारने मदत करणं आवश्यक असल्याचं सांगताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर असलेल्या आपल्या दबदब्याचीही कबुली दिली. ते म्हणाले, “आपण एखादा विषय हातात घेतल्यास त्याला कोणी विरोध करत नाही.”
अलीकडील काळात ग्रामीण भागात कुठे गेल्यानंतर अनेकजण विशेषत: तरुण वर्ग शेती सोडून राजकारणात यायचं असं सांगतात. त्यांनी राजकारणात येण्याला आपला विरोध नाही. मात्र लोक शेती सोडून द्यायला लागले तर त्याचा परिणाम देशावर आणि व्यवहारांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले.
जागतिक मधमाशी दिवस व कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शरद पवार आज बारामतीत आले होते. यावेळी मधूसंदेश प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट शेतकऱ्यांना पवारांच्या हस्ते पुरस्कार देणात आले.
कृषी विज्ञान केंद्रांना राज्य सरकारच्या अखत्यारीत आणण्याचा विचार केला जातो आहे. मात्र शेतीशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रयोग राबवणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रांना केंद्र शासनानंच मदत करणं योग्य आहे. याबाबत आपण लक्ष घातलं तर केंद्रातून याला कोणीही विरोध करणार नाही, असं सांगत शरद पवार यांनी आपला मोदी सरकारवर आजही दबदबा असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement