Pune PFI School : पुण्यातल्या शाळेत विद्यार्थ्यांना रायफल चालवण्याचं ट्रेनिंग; PFI च्या शाळेतील धक्कादायक प्रकार उघड
पुण्यातील कोंढवा परिसरातील पीएफआयच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना रायफल चालवण्याचं ट्रेनिंग देत असल्याचा आरोप NIA ने केला आहे.
Pune PFI School : शिक्षणाचं माहेर घर असलेल्या (Pune PFI School) पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील पीएफआयच्या (PFI) एका शाळेत विद्यार्थ्यांना रायफल चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा आरोप NIAने केला आहे. त्यांच्या आरोपपत्रात हा आरोप करण्यात आला आहे. ब्लू बेल हायस्कूल या शाळेच्या इमारतीत असलेल्या चौथ्या मजल्यावर हा प्रकार सुरु होता. या घडत असलेल्या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात ब्लू बेल्स हायस्कूल नावाची शाळा आहे. या शाळेच्या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियातर्फे (PFI) मुस्लिम तरुणांना कट्टरपंथीय बनवण्यासाठी शिबिर घेतली जात होती. तसंच हल्ल्यांसाठी प्रशिक्षण देत होती, असा स्पष्ट दावा NIA ने केला आहे. काही महिन्यापूर्वी PFI देशभरात कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी या शाळेवरदेखील कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या शाळेची NIA ने झडती घेतली होती. त्यावेळी काही दस्ताऐवज शाळेतून जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा खटला दिल्लीत सुरु आहे. एनआयएने 22 सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारातल्या दोन मजल्यांची झडती घेतली होती. जप्त केलेल्या काही दस्तऐवजांनुसार या मालमत्तेचा वापर आरोपींनी केडरसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी केल्याचं आढळून आलं.
कशाचं प्रशिक्षण देण्यात यायचं?
या शाळेच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर नव्याने भरती झालेल्या PFI कॅडरना प्रशिक्षण दिलं जात होतं. इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या संघटनेच्या विचारसरणीला विरोध करणार्या प्रमुख नेत्यांवर हल्ला करण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं जायचं. त्यांची हत्या करण्यासाठी विविध शस्त्रांचा वापर कसा करायला हे शिकवलं जात असत.
NIA ने कोणते आरोप केले?
NIAने आरोप केला की, PFI निरपराध मुस्लिम तरुणांना शाळेच्या आवारात भरती करत आहे आणि 2047 पर्यंत देशात इस्लामिक शासन स्थापन करण्यास विरोध करणार्यांना संपवण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना सशस्त्र आणि निशस्त्र प्रशिक्षण देत आहे. NIA ने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 अंतर्गत केलेल्या तरतुदीचा वापर केला.NIA ने 13 एप्रिल 2022 रोजी नोंदवलेल्या एका प्रकरणात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. NIA ने PFI सह 20 आरोपींची नावे घेऊन दिल्लीतील NIA विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले.
संबंधित बातमी-
महाराष्ट्र एटीएसकडून PFI प्रकरणात आरोपपत्र दाखल, देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप