एक्स्प्लोर
Advertisement
Pimpri Chinchwad | वाढत्या कोरोनामुळं पिंपरी चिंचवडमध्ये आता 'हे' नवे आदेश
वाढत्या कोरोनामुळं पिंपरी चिंचवड शहरात नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड : शहरात गेल्या दोन दिवसाला 1400 हुन अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटलांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केलीये. यलो, ऑरेंज आणि रेड झोनची निर्मिती करण्यात आली आहे. ती कशी असेल, तसेच इतर नवे आदेश काय आहेत? वाचा सविस्तर..
शहरात आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येनुसार वर्गीकरण करण्यात आलंय.
- अ - एकूण लोकसंख्येच्या 5% पेक्षा कमी रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास पिवळा भाग (यलो झोन)
- ब - एकूण लोकसंख्येच्या 5 ते 20% रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास नारंगी भाग (ऑरेंज झोन)
- क - एकूण लोकसंख्येच्या 20% पेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास लाल भाग (रेड झोन) घोषित करण्यात येणार. तसे फलक त्या-त्या परिसरात लावले जाणार आहेत.
- सार्वजनिक थुंकणे, विनामास्क वावरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, सॅनिटायजरचा सुविधा न करणे याचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 8 भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
- भाजी मंडई, बाजार पेठ, मजूर अड्डे यांसह इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन केले जातंय का? न ऐकणाऱ्यांच्या आस्थापना सील कराव्यात. या कारवाईसाठी स्वतंत्र 8 पथकं नेमण्यात आलीत यात पोलिसांचा समावेश असेल.
- आठ क्षेत्रीय कार्यालयात वॉर रूम तयार केल्या जाणार आहेत.
- प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्ती वाढवण्यात आल्यात. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
- कोरोनाच्या नियमांची आठवण करून देण्यासाठी रिक्षा, टेम्पोद्वारे जनजागृती केली जाणार
11 मार्च रोजीही एक नियमावली जाहीर केली होती, ती खालीलप्रमाणे
- होम आयसोलेशनमध्ये म्हणजे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी होम आयसोलेशन नियमांचा भंग करुन ते घराबाहेर फिरू नये. अन्यथा त्यांच्यावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
- ज्या सोसायटीत रुग्ण होम आयसोलेट आहे, त्या सोसायटीच्या चेअरमनला त्या बाधीत रुग्णांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. यात हलगर्जीपणा झाल्यास संपुर्ण सोसायटी सील केली जाणार आहे.
- दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तसेच इतर कोरोना नियमांचे उल्लंघन झाले, तर संबंधित दुकान मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून ते दुकान तात्काळ सील ही केले जाईल.
- भाजी मार्केटमध्ये समविषम पध्दतीने मार्केट चालु ठेवावे. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोरोना नियमांचे पालन होईल याची मार्केट असोशिएशनने दक्षता घ्यावी. अन्यथा पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल.
प्रशासनाकडून ही तयारी सुरू
- कोरोना लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याने शहरात विविध ठिकाणी 50 केंद्र सुरु करण्यात येणार आली आहेत.
- सर्व उद्याने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आलीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
शिक्षण
Advertisement