Namdev Jadhav : शरद पवारांवरील वक्तव्य भोवलं; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांना काळं फासलं, कोण आहेत नामदेव जाधव?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सतत वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे.
Namdev Jadhav : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पवारांवर सततचे आरोप केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे. त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली गेली होती. मात्र कार्यकर्त्यांनी एरंडवणे परिसरात जाधवांना गाठलं आणि त्यानंतर त्यांनी जाधवांच्या फोटोला काळं फासलं.
नामदेव जाधव कोण आहेत?
मागील काही दिवसांपासून नामदेव जाधव हे शरद पवार यांच्यावर टीका करत आहे. शाळेत असताना गैरमार्गाने गुण वाढवले म्हणून नामदेव जाधव यांना विद्यार्थी, पालक व शाळा प्रशासनाने धक्के मारून शाळेतून हाकलून लावलं होतं. नामदेव जाधवच्या विरोधात विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हाही दाखल आहे. सध्या ते जामीनावर आहे. ते राज्य सरकारमधील एका मंत्र्याकडून सुपारी घेऊन शरद पवार यांच्यावर टीका करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
माफी मागितली नाही म्हणून सांगून काळं फासलं!
नामदेव जाधवच्या हा हेतूत राज्यात ओबीसी विरूध्द मराठा असा असा संघर्ष उभा करत आहे. 1983 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण लागू झालं अशी बतावणी हे नामदेव जाधव करत आहे. वास्तविक पाहता 1983 साली पवार विरोधीपक्षनेते होते तर ओबीसी आरक्षण हे 1990 च्या दशकात देण्यात आले आहे. म्हणूनच नामदेव जाधव करत असलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पुरावे उघड करावेत अन्यथा पवार जाहीर माफी मागावी असा ईशारा आम्ही नामदेव जाधवला दिला होता. अन्यथा त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी पूर्वसूचनाही दिली होती. असं असतानाही नामदेव जाधवने पुरावे सादर केले नाहीत, पवारांची माफीही मागितली नाही, असेदेखील आरोपी त्यांनी केले नाही.
...तर पुन्हा काळं फासू!
केवळ प्रसिद्धीसाठी किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन कोणत्याही पुराव्याशिवाय पवारांवर टीका करणाऱ्या लोकांना आम्ही नामदेव जाधवच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की यापुढे कोणीही शरद पवारांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याही तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.
इतर महत्वाची बातमी-