एक्स्प्लोर

आंदोलन करण्याची परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जातेय? : शरद पवार

“मोदी जेव्हा परदेशात जातात, तेव्हा भाजपमधील दिल्लीतील खासदार निर्धास्त असतात. मी त्यांना सांगतो, 1977 ला पण अशीच परिस्थिती होती.”

पुणे : आंदोलन करण्याची मुद्दाम परिस्थिती निर्माण केली जातेय का, असा मला प्रश्न पडतो, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. ते पुण्यात पत्रकार संजय आवटे यांच्या ‘वुई द चेंज’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीवर काय म्हणाले शरद पवार? ”गोखले अर्थशास्त्र संस्थेकडे काम सोपवण्यात आले की, कोणत्या समाजाचे लोक आत्महत्या करत आहेत. त्या संस्थेचा अहवाल आला की, 52 टक्के शेतकरी मराठा समाजातील आहेत. विस्थापित मजुरांचं प्रमाणही मोठं आहे. ही अस्वस्थता मराठा मोर्चा आणि आरक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडते आहे.”, असे शरद पवार म्हणाले. मात्र, घटनेमध्ये जी ज्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे, त्यांच्या अधिकारांना, हक्कांना धक्का देखील लागता कामा नये, असेही पवारांनी नमूद केले. यावेळी, “मुद्दाम आंदोलन करण्याची परिस्थिती निर्माण केली जातेय का, असा मला प्रश्न पडतो. आज गावा-गावात वातावरण बिघडतंय. लोकांचा सरकारवर विश्वास राहिलाय, असं मला वाटतं नाही.”, असेही शरद पवार म्हणाले. मोदींवर निशाणा “मोदी जेव्हा परदेशात जातात, तेव्हा भाजपमधील दिल्लीतील खासदार निर्धास्त असतात. मी त्यांना सांगतो, 1977 ला पण अशीच परिस्थिती होती.”, असे पवार म्हणाले. तसेच, “राजकीय नेतृत्वापेक्षा आपल्या अधिकारांबाबत सजग असलेला नागरिक अधिक महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक या देशातील लोक सहन करत नाहीत.” असेही पवार म्हणाले. बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावर भाष्य “यूपीएच्या काळात 40 हजार बांगलादेशींना परत पाठवले. पण ते बांगला देश सरकारशी बोलून. या सरकारने फक्त 1200 लोकांना परत पाठवलं आहे. मात्र 40 लाख लोकांना परत पाठवण्याचं बोललं जातंय. मात्र बांगलादेश सरकारनं ते 40 लाख लोक आमचे नाहीत, असं म्हटलंय. मग या बांगलादेशी नागरिकांच काय करायचं ?”, असे म्हणत पवारांनी बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावरही भाष्य केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget