Pune BJP-Shivsena: पुण्यातील भाजपच्या 100 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब, पहिला यादी आजच जाहीर होणार? भाजप-सेना जागांचा तिढा सुटेना
Pune BJP-Shivsena: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी काल रात्री उशिरा अंतिम करण्यात आली असल्याची माहिती आहेत.

पुणे: राज्यातील महानगरपालिकांच्या अनुषंगाने बैठका, चर्चा, जागावाटप यांना वेग आला आहे, अशातच पुण्यात भाजप (Pune BJP) यादीवर मुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची (Pune BJP) पहिली यादी काल रात्री उशिरा अंतिम करण्यात आली असल्याची माहिती आहेत.तर दुसरीकडे उर्वरित जागांमध्ये युती करून लढण्याची तयारी सुरू असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा जागांचा तिढा सुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(Pune BJP)
Pune BJP-Shivsena: महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम
पुणे महानगरपालिकेत लढत असतानाच शिंदे गट आपल्या जागांवर ठाम असल्याचं चित्र आहे. महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम आहे. पुण्यात महायुतीमध्ये जागावाटप सन्मानाने व्हावी अशी अपेक्षा करून महायुतीमध्ये 35 ते 40 जागांवर ठाम राहणार असल्याची भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे. तर पुण्यात मोठा भाऊ असलेल्या भाजपने 125 जागा जिंकण्याचा निर्धार केल्याने शिवसेनेच्या मागणीनुसार शिवसेनेला एवढ्या जागा मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतो आहे. पुणे महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढवण्याचे निश्चित झाल्यानंतर ही शिवसेना आणि भाजप जागा वाटपाचा पेच सुटलेला नाही. शिवसेनेकडून 35 जागांची मागणी केली जात असताना भाजपकडून अवघ्या 15 जागांचा प्रस्ताव सेनेला दिला आहे.
शिवसेनेच्या काही अस्वस्थ कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली आहे. शिवसेनेची 35 जागांची मागणी आहे, त्यावर भाजपने 15 जागा देऊ केल्या आहेत, मात्र आमची 25 ते 30 जागाच्या अपेक्षा आहे, तितक्या जागा मिळाव्या, अशी मागणी पुण्यातील शिवसैनिकांनी केली आहे.
Pune BJP-Shivsena: भाजप यादीवर मुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब
भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी काल रात्री उशिरा अंतिम करण्यात आली आहे. शंभरहून अधिक नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस या यादीतील नावांना मान्यता देऊन आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात बुधवारी झालेल्या भाजपच्या कोर कमिटी बैठकीत 100 पेक्षा अधिक उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली आहेत, या उमेदवारांच्या नावाची यादी घेऊन भाजपचे प्रमुख पदाधिकारी काल मुंबईला गेले होते. अंतिम करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा करून 41 प्रभागातील प्रमुख उमेदवारांनी यादी कोअर कमिटी बैठकीत तयार करण्यात आली होती.
























