एक्स्प्लोर

Naib Tehsildar Ananta Gawari Accident Pune: ओतूर जुन्नर मार्गावर अपघात; जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा मृत्यू

Naib Tehsildar Ananta Gawari Accident Pune: अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Naib Tehsildar Ananta Gawari Accident Pune जुन्नर/पुणे: ओतूर-जुन्नर मार्गावरील पांगरी माथा ते बनकर फाटा दरम्यान हायवा डंपर आणि होंडा सिटी कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला असून, या अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जुन्नरकडून ओतूरच्या दिशेने जाणारा हायवा डंपर आणि ओतूरकडून जुन्नरच्या दिशेने येणारी होंडा सिटी कार यांची वळणावर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात अनंता गवारी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यासह विजय खारतोडे यांनाही गंभीर दुखापत झाली, तर तुषार भीमराव कोरडे किरकोळ जखमी झाले आहेत.

उपचारासाठी नेत असतानाच अनंता गवारी यांची प्राणज्योत मालवली- (Naib Tehsildar Ananta Gawari Accident)

स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले आणि ओतूर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने अनंता गवारी आणि विजय खारतोडे यांना पुण्याकडे हलवण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच अनंता गवारी यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, संबंधित डंपर हा मांदारणे येथील ‘विघ्नहर्ता खडी केशर अँड पेवर्स’ कंपनीचा असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप- (Naib Tehsildar Ananta Gawari Accident)

अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. पांगरी माथा परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, वेगाने धावणाऱ्या जड वाहनांवर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, अशी जोरदार मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात! मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर

महत्त्वाच्या बातम्या

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget