Pune Metro line inauguration: PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
Pune Metro line inauguration: रविवारी २९ तारखेला लोकार्पण होणार आहे, मात्र याविरोधात मविआचे नेते संतप्त झाले आहेत, त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, तर लाल फित कापत त्यांनी लोकार्पण केलं असून आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार म्हणत आक्रमक झाले आहेत.
![Pune Metro line inauguration: PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक MVA attempt to inaugurate Pune Metro in Pune Activists of MVA are angry at the metro site demand to start metro today Pune Metro line inauguration: PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/27/1aa522d1fec68007a3ce67825bd23ed517274169873871075_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा कालचा(गुरूवारी) होणारा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit) मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला. मोदींच्या हस्ते काल सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होते. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा करण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी दौरा रद्द झाला म्हणून सत्ताधारी नेत्यावर हल्लाबोल केला, त्याचबरोबर मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र, लोकार्पणसाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप केला, त्यानंतर आता या लोकार्पण सोहळ्याची नवी तारीख समोर आली आहे. रविवारी २९ तारखेला लोकार्पण होणार आहे, मात्र याविरोधात मविआचे नेते संतप्त झाले आहेत, त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, तर लाल फित कापत त्यांनी लोकार्पण केलं असून आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार म्हणत आक्रमक झाले आहेत.
काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरू झालं आहे, मोदींच्या येण्याची वाट पाहण्याची गरज नाही, सामान्यांचे पैसे आहे, त्यांचा अपव्यय होत आहे, काल मोदींनी मेट्रोचं ऑनलाईन पध्दतीने का लोकार्पण केलं नाही, असाही सवाल नेत्यांनी उपस्थित केला आहे. जोवर मेट्रो सुरू होत नाही, तोवर आम्ही इकडून हलणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे, आंदोलक संतप्त झाले आहेत.
यावेळी महाविकास आघाडीच्या संतप्त नेत्यांनी आम्हाला मेट्रो स्टेशनवरती जाऊ द्या म्हणत पोलिसांना आवाहन केलं. मात्र, घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांना समजत नाही विरोधक देखील कधीतरी सत्ताधारी होतील, पोलिस अत्याचार करत आहेत, पुणे शहराला सहकार्य करत नाहीत, पोलिसांना पुणे शहराला सहकार्य केलं पाहिजे, असंही आंदोलकांनी म्हटलं आहे. पोलिसांनी यावेळी आंदोलकांना २९ तारखेला लोकार्पण होईल असं सांगत शांत होण्याचं आवाहन केलं मात्र, जमलेल्या मविआच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत आजच मेट्रोचं लोकार्पण झालं पाहिजे असं म्हणत, जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे, त्यांच्या बाराचा पैसा नाही, सामान्य जनतेचा पैसा आहे, पुणेकरांनी केंद्रीय मंत्री दिला आहे, त्यांच्या हातून लोकार्पण केलं असतं तर मोदींना चाललं नसतं का असा सवाल देखील यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
यावेळी उपस्थितांनी जेष्ठांच्या हातून लाल फित कापून लोकार्पण करून आजच मेट्रो खुली करून द्यावी अशी मागणी मविआच्या नेत्यांनी केली, आज त्यांनी भर पावसात हे आंदोलन सुरू केलं आहे, आज मेट्रो सुरू होत नाही, तोवर आम्ही आणि हार्डिकरांना घरी जाऊ देणार नाही, आम्हीही घरी जाणार नाही, आम्ही त्यांच्या ऑफीसमध्ये बसू असं आंदोलकांनी म्हटलं आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे, त्याचबरोबर आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांना बाहेर बोलावतो, त्यांना तुम्ही तुमचं निवेदन द्या असं आवाहन केलं आहे, मात्र, आंदोलकांनी मेट्रो स्टेशनवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)