Pune Crime News: पुण्यात खूनाचं सत्र सुरुच! पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून खून
पुण्याच्या बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीतबसा कमलचंद जानी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
Pune Crime News: पुण्याच्या (pune) बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीतबसा कमलचंद जानी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे, आकाश पवार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारच्या रात्री आठच्या सुमारास पीतबसा यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यांच्या डोक्यात, हातावर वार करण्यात आलेत. आरोपी फरार असून त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.
नक्की काय घडलं?
पीतबसा कमलचंद जानी यांचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला. पुण्यातील बावधन परिसरात या खूनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या सगळ्यात जुने वाद टोकाला गेल्याने खून केल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एक आरोपी फरार असल्याने हिंजवडी पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.
पुण्यातील खूनाच्या गुन्हांच्या प्रमाणात काही महिने झाले प्रचंड वाढ झाली आहे. रोज अशा खूनाच्या अनेक घडना पुढे येत आहेत. काही दिवसांपुर्वी पुण्यातील येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मित्रांसोबत कोकणात फिरायला जाण्यासाठी आईने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आईवरच कोयत्याने सपासप वार केले होते. घडलेल्या घडनेची माहिती स्वत: आईने पोलिसांना दिली होती. पुण्यातील वडगावशेरी परिसरात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी संबंधित मुलावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली होती.
औरंगाबादमध्ये झाला होता चाकू हल्ला
औरंगाबाद शहरातील वाळूज महानगर भागात नळाचे पाणी भरण्यावरून दोन कुटुंबीयांत जोरदार हाणामारी होऊन चौघांना चाकूने भोसकल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. दरम्यान यातील जखमी प्रभाकर चोरमले (49) यांचा 11 जून रोजी उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. अन्य तिघांवर घाटीत उपचार सुरू असून एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.