Mumbai Pune Expressway : न्यू ईयरलाही पुणे - मुंबई एक्सप्रेस वे जॅम? महामार्ग पोलिसांकडून केवळ आवाहन, कारवाई नाहीच
नाताळ आणि नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर महामार्ग पोलिसांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा प्रवाश्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नाताळच्या सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune Mumbai Expressway) वाहतूक कोडींचा सामना प्रवश्यांना करावा लागला. पण त्यातून देखील महामार्ग पोलिसांनी धडा घेतलाच नाही का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. कारण आता नव वर्षाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने अवजड वाहतुकदारांना पुन्हा एकदा केवळ आवाहन करण्यातच वाहतूक पोलिसांनी धन्यता मानली असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे नव वर्षाच्या सेलिब्रेशनच्या वेळेस देखील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना प्रवाश्यांना करावा लागणार असल्याचं म्हटलं जातंय.
बेशिस्त अजवड वाहतूकदार महामार्ग पोलिसांच्या आवाहनाला नेहमीच केराची टोपली दाखवत असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान ही बाब मागील आठवड्यातच सिद्ध देखील झालं होती. पण तरीही पुन्हा एकदा महामार्ग पोलिसांनी केवळ आवाहन केल्यामुळे पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडीला आमंत्रण देत असल्याचं म्हटलं जातंय. वाहतूक कोंडीबाबत महामार्ग पोलिसांच्या या भूमिकेमुळे प्रवाश्यांमधून देखील नेहमी नाराजीचा सूर उमटतो.
महामार्ग पोलिसांकडून पुन्हा एकदा आवाहन
शनिवार 30 डिसेंबर आणि रविवार 31 डिसेंबर अशा सलग सुट्ट्या आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेश यासाठी बरेच लोक पर्यटन स्थळांवर जात असतात. त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सलग सुट्टी आल्यामुळे घाटमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पण हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते आणि वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहनांना पुन्हा एकदा प्रवास करण्यास परवानगी देण्यात येते.
मागील वाहतूक कोंडीचे परीक्षण केले असता मागील शनिवारी 24 तासांमध्ये 55,868 वाहने द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनी वरून गेली. तसेच मुंबई पुणे जुना महामार्ग NH 48 या वरून 21,135 वाहने गेली. सदर वाहनांना घाटामधील संयुक्तिक मार्गाचा सुद्धा वापर करावा लागतो. इतक्या प्रचंड प्रमाणात वाहने आल्यानंतर घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली होती.तरी सर्व जड अवजड वाहन मालक,चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, वर नमूद दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी 12.00 नंतर सुरू केल्यास त्यांना घाटामध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच वाहतूक कोंडी मुळे सदर वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिन चे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन व वेळची बचत होईल.
हेही वाचा :
Supriya Sule : प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून 12 जागा मिळणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या....