एक्स्प्लोर

मुंबईचे भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढांसह चौघांविरोधात खंडणी आणि फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा, ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचे सुरेंद्रन नायर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भादवि कलम 384, 385, 406, 420, 120 (ब) 34 या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आणि मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांच्यासह चार जणांवर  फसवणूक आणि खंडणीप्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. 

मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा, ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचे सुरेंद्रन नायर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भादवि कलम 384, 385, 406, 420, 120 (ब) 34 या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एका 54 वर्षीय महिला वकिलाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी या पुण्यात राहतात. त्यांना मुंबईत फ्लॅट घ्यायचा होता. त्यानंतर मित्रांच्या चौकशीतून त्यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या वरळीतील लोढा पार्क या इमारतीत फ्लॅट बुक केला होता. मंगल प्रभात लोढा हे ज्वाला रिअल इस्टेट लिमिटेड कंपनीत (नंतर नाव मायक्रोटेक डेव्हलपर्स झाले) चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर होते होते. तर अभिषेक लोढा आहे सध्या या कंपनीत चेअरमन आहेत. 

दरम्यान फिर्यादी यांनी लोढा यांच्या या स्कीममध्ये ब्लॅक बुक करण्याचे निश्चित केले. त्यानंतर कंपनीचा माणूस सुरेंद्र नायर यांच्या पुण्यातील घरी आले. त्याने त्यांना फ्लॅटची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर 5 कोटी 59 लाख 27,127 रुपयात या फ्लॅटचा सौदा ठरला.  यातील 3 कोटी 92 लाख रुपये फिर्यादीने दिले होते. परंतु 2013 पासून ते आजपर्यंत फिर्यादीला  फ्लॅटचे पजेशन मिळाले नाही. याशिवाय  वेळोवेळी त्याची रक्कम वाढवून सांगत आणखी 4 कोटी 15 लाख 15 हजार 386 रुपये भरा अन्यथा तुमचे अग्रीमेंट टू सेल रद्द करण्यात येईल असे सांगितले. वाढीव रक्कम भरण्यासाठी आरोपींनी बळजबरी केली असून फसवणूक करून खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच वरळीतील लोढा पार्क या इमारतीतील 3901 विंग A हा फ्लॅट हडप केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांवर हा गुन्हा दाखल केला आहे. मंगलप्रभात लोढा हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष असून मलबार हिल  विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर अशाप्रकारे खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. चतु:शृंगी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलंTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMaharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Embed widget