एक्स्प्लोर

Supriya Sule Sansad Ratna : खासदार सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा ठरल्या 'संसद महारत्न'

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रदान करण्यात आला

दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीने सर्वोत्तम संदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल, गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, संसदरत्न अवाॅर्ड कमिटीच्या चेअरपर्सन आणि फाउंडेशनच्या विश्वस्त प्रियदर्शनी राहुल आदी यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार आणि संस्थेविषयी फौंडेशनचे श्रीनिवासन यांनी यावेळी माहिती दिली. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून संसदरत्न, विशेष संसदरत्न, संसद महारत्न तसेच संसद मनरत्न पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून गत 16 व्या आणि विद्यमान 17 व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात एकूण 93 टक्के उपस्थिती लावत 248 चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल 629 प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर 16 खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना सलग आठ संसदरत्न पुरस्कार तसेच संसद महारत्न पुरस्काराने गाैरवण्यात आले आहे. सुळे यांना आज प्रदान करण्यात आलेला संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार हा दहा वर्षातून एकदा देण्यात येतो.

सुळे यांच्या दहा वर्षाचा संसदीय कामगिरीची दखल घेऊन पुरस्कार निवड समितीचे चेअरमन संसदीय कामकाजमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील समितीने निवड केल्यानंतर आज त्यांना हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कार स्वीकारताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदाराचा हा सन्मान असल्याची  भावना व्यक्त करत मतदार संघातील जनतेला पुरस्कार अर्पण करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, 'हा पुरस्कार माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघासह माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी ज्या विश्वासाने मला लोकसभेवर निवडून पाठविले. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. जनतेचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळेच हा पुरस्कार शक्य झाला आहे. म्हणूनच हा बहुमान माझ्या मतदारसंघातील जनतेला अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे'.

इतर महत्वााची बातमी-

Rohit Pawar On Ajit Pawar : पुतण्याचा काकावर पलटवार!  अजित दादांकडून ही अपेक्षा नव्हती; रोहित पवारांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावरABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरूDevendra Fadnavis on Beed Case | कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Embed widget