Pune news : शेवटी आईचंं काळीज! पोटच्या लेकरासाठी ती मध्यरात्री थेट बिबट्याला नडली अन् लेकराचा जीव वाचवला, नेमकं काय घडलं?
Pune Leopard Attack : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव थोरांदळे फुटाणे मळा येथील एका मातेने आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी थेट बिबट्याचा प्रतिकार केला आहे. या महिलेच्या कर्तबगारीचं सध्या सगळीकडून चांगलंच कौतुक होत आहे.
पुणे : आई आपल्या लेकरासाठी कधी (Mother) काय करेल आणि कोणासोबत लढेल, याचं काही सांगता येत नाही. मग तो माणूस असो किंवा प्राणी आपल्या लेकरांसाठी आईने दाखवलेली कर्तबगारी आतापर्यंत अनेकदा आपण पाहिली आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील आंबेगाव थोरांदळे फुटाणे मळा येथील एका मातेने आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी थेट बिबट्याचा प्रतिकार केला आहे. या महिलेच्या (Leopard Attack) कर्तबगारीचं सध्या सगळीकडून चांगलंच कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे धनगर समाजाच्या सात महिन्याच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. या घटनेत मुलाच्या आईने बिबट्यास जोरदार प्रतिकार करत आपल्या मुलाचं प्राण वाचवलं आहे. आंबेगाव येथील फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाऊ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या सात महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याच्या शेजारीच बाहेर झोपली होती. रात्री दोन वाजता सुमारास ती झोपली असताना मुलाचा हात अंथरुणाबाहेर पडला होता. त्यावेळी बाजूलाच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला.
मुलावर उपचार सुरु...
त्यानंतर महिलेला जाग आली आणि बघितलं तर मुलाचा हात बिबट्याच्या तोंडात होता. त्यावेळी लगेच सोनलने बिबट्याच्या अंगावर जात मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. एका हाताने बिबट्याचं तोंड धरलं तर दुसऱ्या हातात लेकरु होतं. त्यावेळी जोरजोरात आरडा ओरडही सुरु केली. त्यांनंतर सोनल यांचे कुटुंबीय बाहेर आले आणि त्यांनीही आरडा ओरड सुरु केली. हे पाहून बिबट्याने पळ काढला. या हल्ल्यात सात महिन्याचा मुलाला थोडी इजा झाली आहे. त्यानंतर मुलाला आणि आई सोनल यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर लस देण्यात आली आहे. सध्या मुलावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे उपचार सुरु आहेत.
नागरीक धास्तावले...
मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Crime news : पुण्यात नेमकं चाललंय काय? 17 वर्षीय मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवले अन् नराधमानं....