Pune Crime : लेडीज हॉस्टेलमध्ये शिरुन विनयभंग करण्याचा प्रयत्न; मंत्री तानाजी सावंत यांच्या कॉलेजच्या हॉस्टेलमधील प्रकार
हॉस्टेलमध्ये शिरुन अनोळखी तरुणाने कॉलेजच्या तरुणीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील जे.एस.पी.एम कॉलेजमध्ये लेडीज हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे.
Pune Crime News : हॉस्टेलमध्ये शिरुन अनोळखी तरुणाने कॉलेजच्या तरुणीवर विनयभंग (Molestation) करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार (crime news) समोर आला आहे. पुण्यातील (Pune) जे.एस.पी.एम कॉलेजमध्ये (JSPM college) लेडीज हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांच्या कॉलेजमध्ये हा प्रकार घडल्यानं सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील हांडेवाडी रोडवर तानाजी सावंत यांचं जेएसपीएम फार्मसी कॉलेज आहे. कॉलेजलगतच हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमधील तिसऱ्या मजल्यावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून पुण्यातील वानवडी पोलीस अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलींंच्या प्रसाधनगृहात शिरून लैंगिक जबरदस्ती
दोन दिवसांपूर्वी हॉस्टेलमधील तिसऱ्या मजल्यावर मुलींच्या प्रसाधनगृहात एक अनोळखी व्यक्ती शिरला होता. तरुणी प्रसाधनगृहात गेली असता या व्यक्तीने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने या छळाला विरोध करुन तातडीने कॉलेज प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांना संपूर्ण माहिती सांगितली. या प्रकरणासंदर्भात पुण्यातील वानवडी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या अनोळखी व्यक्तीवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत.
सुरक्षा रक्षक काय करत होते?
या कॉलेजचा परिसर मोठा आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये अनेक सुरक्षा रक्षक असतात. या सगळ्यांची नजर चोरुन अनोळखी व्यक्तीने मुलींच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश कसा केला? दोन दिवस कॉलेज प्रशासनाने पोलिसांकडे धाव का घेतली?, असे प्रश्न विचारले जात आहे.
आरोग्यमंत्र्यांचं कॉलेज मुलींसाठी असुरक्षित
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं हे जेएसपीएम कॉलेज आहे. याच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. घटनेमुळे कॉलेजच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोग्यमंत्र्यांचं कॉलेज मुलींसाठी असुरक्षित असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सध्या संताप व्यक्त केला जात आहे. यावर कॉलेज प्रशासनाने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे.
तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पुण्यात अनेक कॉलेज आहेत. या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशाभरातून अनेक तरुण-तरुणी शिक्षणासाठी येतात. मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक कॉलेजमध्ये त्यांच्या आवारात हॉस्टेल आहेत तर अनेक तरुणी खासगी हॉस्टेलवर राहतात. मुलीच्या सुरक्षेसाठी पालकवर्ग कॉलेजच्या हॉस्टेलला प्राधान्य देतात. मोठ्या आकड्याच्या फी भरतात मात्र याच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अशा प्रकारच्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.