एक्स्प्लोर

Raj Thackeray: तयारीला लागा! मनसे पुण्यातील सर्व जागा लढणार लढवण्याच्या तयारीत, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Raj Thackeray: पुणे शहरातील कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कॅन्टोन्मेट हे 6 आणि हडपसर, खडकवासला हे दोन असे 8 विधानसभा मतदारसंघाबाबत राज ठाकरेंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे.

Raj Thackeray: राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. बैठका, दौरे, सभा, पक्षप्रवेश आणि जागावाटपाच्या चर्चा अशा घडामोडींना वेग आला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीला एकही उमेदवार न देणाऱ्या मनसेने देखील विधानसभेला किती जागा लढवणार याबाबतची चाचपणी सुरू केली आहे. अशातच पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 जागा लढवणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

फक्त शहरातीलच नाही तर पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व 21 जागा आपण लढवणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. दोन दिवस झालेल्या पुणे दौऱ्यावेळी ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली, त्यावेळी त्यांनी शहरातील ८ व जिल्ह्यातील अन्य विधानसभा (Vidhan Sabha) मतदारसंघांची पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होती. मात्र आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढणार असल्याचं राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर आता मनसेकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे काही भागामध्ये दौरे करत आहेत, बैठका घेत आहेत, त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असा आदेश दिला होता. पुण्यातील दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी यासंदर्भात कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कॅन्टोन्मेट हे 6 आणि हडपसर, खडकवासला हे दोन असे 8 विधानसभा मतदारसंघाबाबत राज ठाकरेंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे मतदारसंघ आपण लढवणार आहोत, कामाला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत. नवीन शाखा, कार्यकर्त्यांच्या बैठका, जबाबदारी सोपवणे अशा सूचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे ग्रामीणसाठी ठाकरेंनी  (Raj Thackeray) अविनाश जाधव यांची नियुक्ती केली होती. तर पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांकडे राज्यातील काही जिल्ह्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. बाबू वागसकर- सोलापूर, परभणी- ॲड. गणेश सातपुते, हिंगोली- हेमंत संभूस, बुलढाणा- साईनाथ बाबर यांचा समावेश होता. या पदाधिकाऱ्यांनी अहवाल राज ठाकरेंकडे  (Raj Thackeray)  सुपुर्द केले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंबधीचे वृत्त लोकमत या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 27 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
Congress Candidate List: मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  27 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 27 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 27 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
Congress Candidate List: मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
Embed widget