एक्स्प्लोर

Pune MNS News : पीएफआयच्या बंदीनंतर मनसेतर्फे पुण्यात जल्लोष; 51 किलो लाडू वाटून आनंदोत्सव साजरा

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातल्यानंतर पुण्यात मनसेने जल्लोष साजरा केला आहे. फटाक्यांची आतषबाजी करुन आणि 51 किलो लाडू वाटून जल्लोष साजरा केला.

Pune MNS News :  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) बंदी घातल्यानंतर पुण्यात मनसेने जल्लोष साजरा केला आहे. फटाक्यांची आतषबाजी करुन आणि लाडू वाटून जल्लोष साजरा केला. पुण्यातील अलका चौकात 51 किलो लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांनी प्रथम पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात आवाज उठवल्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर बंदी केंद्र सरकारने घातली, याबद्दल मनसेने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याच प्रमाणे अशा देश विरोधी प्रवृत्ती कायमच्या ठेचून काढल्या पाहिजे, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली आहे.

केंद्र सरकारनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्याशी संलग्नित असलेल्या आठ संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. गृह मंत्रालयानं अनलॉफुल अॅक्टिविटीज प्रिवेन्शन एक्ट (UAPA) अंतर्गत PFI वर ही कारवाई केली आहे. UAPA काद्यांतर्गत केंद्र सरकार एखाद्या संघटनेला बेकायदेशीर किंवा  दहशतवादी म्हणून घोषित करू शकतं किंवा त्या संघटनेवर बंदी घालू शकतं. त्यामुळे या संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. 

काय होतं प्रकरण?

पुण्यात काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएने पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. त्यात पीएफआयच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांनी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. या घोषणाबाजी विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठवला होता. 

पाकिस्तानचा ध्वज जाळत विरोध

त्यानंतर पुण्यातील मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात मोठं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात शेकडो मनसैनिक सहभागी झाले होते. या आंदोलनात मनसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला होता आणि पीएफआय संघटनेवर आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

राज ठाकरेंनी ट्विट करत केला होता विरोध

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर पाकिस्तानात चालते व्हा. असली थेरं आमच्या देशात चालणार नाही. माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget