Sunil Shelke : आमदार सुनील शेळके ॲक्शन मोडवर; मावळातील मटका अड्ड्यावर टाकला छापा
Sunil Shelke : मावळचे आमदार सुनील शेळके हे वडगाव शहरात जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून तालुक्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या दौऱ्यात त्यांनी एका मटका अड्यावर छापा टाकला.
Sunil Shelke : आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी मावळमधील (Maval) एका मटका अड्ड्यावर छापा टाकला. मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर (Police) रंगेहाथ पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच सुनील शेळके यांनी एका दारूच्या अड्यावरही छापा टाकलाय.
मावळचे आमदार सुनील शेळके हे वडगाव शहरात जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून तालुक्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. याच दरम्यान दौरा वडगाव शहरात असताना सुनील शेळके नागरिकांशी संवाद साधत होते. आमदार शेळके यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर मटका अड्ड्याबाबत तक्रारींचा पाढा वाचला.
सुनील शेळकेंचा मटका अड्ड्यावर छापा
त्यामुळे आमदार शेळके यांनी थेट ताफ्यासह मटका अड्ड्यावर जावून छापा टाकला. अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर रंगेहाथ पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर प्रभाग ४ मध्ये सुरू असलेल्या दारूच्या अड्डयावरही त्यांनी छापा टाकला.
अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
तसेच, शहरातील वाढती गुन्हेगारी व तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या असून नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबतची विनंती यावेळी सुनील शेळके यांनी केली. दरम्यान, सुनील शेळके प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागेवरच त्याचे निरसन करत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच रेशनिंग धान्य, शासकीय योजना, विविध दाखले, रेशनकार्ड या संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुनील शेळके यांनी चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.
लोहगाव परिसरात महिलेवर अत्याचार
दरम्यान, धर्मांतरासाठी एका महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना पुण्याच्या लोहगाव परिसरात घडली आहे. पीडित महिला पुण्यातील लोहगाव परिसरात राहायला असून एका जिम ट्रेनरकडे जिम लावण्यासाठी गेल्यानंतर त्या दोघांची ओळख झाली. यानंतर तिला धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करून एका 55 वर्षीय आरोपी आणि 30 वर्षीय आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ते महिलेला देत होते. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणात 2 पुरुषांसह एका महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या