Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 73 वर, 14 जण व्हेंटिलेटरवर; अजित पवार ॲक्शन मोडमध्ये
Guillain Barre Syndrome: शहरात दूषित पाण्यामुळे जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, या रुग्णांवर महापालिकेच्या वतीने मोफत उपचार करावेत, अशी मागणी केली जात आहे.
पुणे: पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. पुणे शहरातील गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) एकूण 73 रुग्ण सापडले आहेत. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) रुग्णांची एकूण संख्या पोहोचली 73 वरती पोहोचल्याने पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) एकूण रूग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 47 पुरुष तर 26 महिलांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक 44 रुग्ण आहेत. 9 वर्षापर्यंत असलेले 13 रुग्ण तर 60 ते 69 वयोगटातील 15 रुग्ण आहेत.
गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) ची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत 73 रुग्ण आढळून आले आहेत. यातील काही रुग्णांचे लघवी आणि रक्ताचे नमुने (सॅम्पल) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल 'एनआयव्ही'ने आरोग्य विभागाला पाठवला आहे, यामध्ये 'कॅम्पायलो बँक्टर जेजुनी' या जीवाणू आणि 'नोरो व्हायरस' या विषाणूमुळे दुर्मीळ 'जीबीएस'ची बाधा झाल्याचे आता समोर आले आहे. रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. या अहवालात मूळ कारण निष्पन्न झाले असून, दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरल्याने रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांनी आजाराबाबत घेतली माहिती
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात काही बैठका घेतल्या, त्याचबरोबर त्यांनी गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) या आजाराबाबत माहिती घेतली आहे. सिंहगड रोड परिसरात असलेल्या भागात या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अजित पवारांनी त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून याबाबतची माहिती घेतली आहे. अजित पवार सर्किट हाऊस येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. यावेळी गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) या आजाराबाबत त्यांनी माहिती घेतली आहे. या आजारावर उपचार होण्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहे हा खर्च महापालिकेने करावा अशी मागणी नागरिकांनी आहे.
काय आहे गुलेन बॅरी सिंड्रोम आजार?
गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नसांवर हल्ला करते. यामुळे मज्जातंतूंच्या काही भागांना नुकसान होतं आणि स्नायू कमकुवत होणं, मुंग्या येणं, संतुलन गमावणं आणि त्यानंतर पक्षाघात येण्याचं कारण ठरू शकतात.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या
गुलेन बॅरी सिंड्रोम रूग्णांवर मोफत उपचाराची मागणी
पुणे शहर परिसरामध्ये दूषित पाण्यामुळे जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, या रुग्णांवर महापालिकेच्या वतीने मोफत उपचार करावे. तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहराच्या विविध भागांत सिंहगड रोड आणि परिसरातील ग्रामीण भागांमध्ये दूषित पाण्यामुळे गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) या गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत अनेक रुग्णांची नोंद करण्यात आली असून, त्यातील काही रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या सर्व रुग्णांवर महापालिकेने मोफत उपचार करावेत. तसेच औषधोपचाराची तातडीने व्यवस्था करावी. तसेच दूषित पाण्याचा मूळस्त्रोत ओळखण्यासाठी त्वरित जल तपासणी मोहीम हाती घ्यावी. शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या स्थितीत त्वरित आणि प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )