Pune Crime News : मित्रानेच मित्राला संपवलं! बिबवेवाडीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नीरा नदीत सापडला
पुणे बिबवेवाडी येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पुणे-सातारा जोडणाऱ्या नीरा नदीच्या पात्रात ट्रेकर्स मंडळींना मिळून आला आहे. निलेश वरखडे असं बेपत्ता झालेल्या व्यक्तीचं नाव होतं.
Pune Crime News : पुण्यातील बिबवेवाडी (Pune)परिसरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पुणे-सातारा जोडणाऱ्या नीरा नदीच्या पात्रात ट्रेकर्स मंडळींना मिळून आला आहे. निलेश वरखडे असं बेपत्ता झालेल्या व्यक्तीचं नाव होतं. वरगडे पुण्यात हे वास्तुतज्ञ होते. ते बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार त्यांची पत्नी रूपाली यांनी पुणे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार शोध सुरू असताना त्यांचा गाडी चालक दीपक नरळे याच्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर दीपकने दिलेली माहिती धक्कादायक होती. चालक आणि मित्रांनी मिळून त्यांची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
कट रचून दिवाळी पूर्वी केली होती हत्या
निलेश वरखडे त्यांचा चालक दिपक आणि त्याचा मित्र रणजीत जगदाळे या दोघांनी मिळून प्लॅन करून नीलेश वरखडे यांना कॉफी मधून गुंगीचे औषध दिले आणि नंतर त्यांचा दोरीने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह एका पोत्यात बांधून त्यांनी हे पोते पुणे- सातारा नदीच्या पात्रात फेकून दिले. हा प्रकार दिवाळीपूर्वीच उजेडात आला होता. मात्र मृतदेहाचा शोध लागत नव्हता.
दोन्ही आरोपी अटकेत
आज दिवसभराच्या शोधात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यावेळी या दोघांकडून निलेश वरगडे यांच्या अंगावरील दागिने त्यांचे मोबाईल हे जप्त केले होते. मात्र निलेश यांचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर ट्रेकर्स मंडळींच्या प्रयत्नांना आज यश आले आणि निलेश वरखडे यांना पोत्यात बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळाला. याबाबतचा पुढचा तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.
मित्र आणि चालकानेच केला घात
निलेश वरखडे याचा चालक आणि मित्रानेच त्यांंचा घात केला. त्या दोघांनीही कट रचला आणि वरखडे यांची हत्या केली. ही हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली हत्या करण्यात आली हे अजूनही स्पष्ट झालं नाही आहे. मात्र दोघांनी त्यांच्या गळा आवळून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिवाळीच्या पूर्वीपासून त्यांचा शोध सुरु होता घरातील व्यक्ती बेपत्ता असल्याने कुटुंबीयदेखील अस्वस्थ झाले होते. ऐन दिवाळीत बेपत्ता असल्याने घर विस्कळीत झालं होतं. आज सकाळी ट्रेकर्सने त्यांचा शोध होते. त्यांना नदीच्या पात्रात पोत्यात गुंडाळून मृतदेह सापडला. अखेर त्यांचा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. हत्येचं नेमकं कारण काय?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.