एक्स्प्लोर

Missing Link Mumbai Pune: मिसिंग लिंक 18 तासांनी सुरु झाला पण बोगद्याच्या तोंडावर 'धबधबा', लहान दगड धडाधड खाली, अजूनही वाहनांसाठी धोका?

Missing Link Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे मिसिंग लिंक मार्ग तयार करण्यासाठी सात हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. पहिल्याच पावसात खड्डे आणि दरड कोसळल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Missing Link Mumbai Pune: लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी दिवसभर दरड कोसळून ठप्प झालेली पुणे-मुंबई मिसिंग लिंक (Missing Link) मार्गिका तब्बल अठरा तासांनी खुली करण्यात आली होती. मात्र, सध्या दोनचं लेनवरून वाहतूक सुरु आहे. कारण बोगद्याच्या वरुन अद्यापही धबधब्यासारखं पाणी वाहतंय, त्यातून छोटी-छोटी दगडं ही खाली येतायेत. त्यामुळं इथला धोका खरंच टळलाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (Maharashtra Rain news)

काल दरड कोसळल्यानंतर मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा खाली आला होता. साडेअठरा तासांनी पुणे-मुंबई मिसिंग लिंक मार्गिका खुली करण्यात आली आहे.  पहाटे चार वाजता मिसिंग लिंकवर दरड कोसळली, धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं, बांधकाम कोसळलं. त्यामुळे हा सगळा राडारोडा हटवायला 18.30 तास लागले. दरम्यान, आता  पुण्याहून मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंकची मार्गिका खुली करण्यात आली. मात्र, या निमित्ताने मोठ्या थाटामाटात उद्घाटनं आणि हजारो कोटींचा खर्च सगळंच पावसाच्या पाण्यात वाहून गेलं म्हणण्याची वेळ आली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचा पहिल्याच पावसात फज्जा उडाल्याचं पाहायला मिळाले. तसंच सात हजार कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकबाबत अनेक प्रश्नही उपस्थित झालेत. (Mumbai Pune Missing Link start or not)

Rain Updates: महाराष्ट्रात मागील 24 तासात (सकाळी 8.30 पर्यंत)
 

कोल्हापूर - ४३ मिमी 
पुणे - ९७.५ मिमी 
नाशिक - ८३.६ मिमी 
सातारा - ७०.३ मिमी 
सांताक्रुज - ९०.४ मिमी 
कुलाबा - ५७.२ मिमी 
महाबळेश्वर- ४०३ मिमी
डहाणू - ३९९ मिमी

Lonavala Rain: लोणावळ्यात 24 तासांत तब्बल 490 मिमी पाऊस

लोणावळ्याला कालच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. गेल्या चोवीस तासांत तब्बल 490 मिलिमीटर पाऊस बरसला. आजवरचा हा विक्रमी पाऊस असल्याचं बोललं जातंय. पावसाचा हा जोर पाहून लोणावळा आणि परिसरातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्यात. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांवर निर्बंध लावण्यात आलेत.

Devendra Fadnavis on Rain: अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे मार्गावर दरड कोसळली. या सगळ्या घटना निसर्गाचे चक्रं बदलल्यामुळे घडत आहेत. प्रशासनाने सगळी तयारी केली होती, पण त्याच्या विपरीत घटना घडत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. जशी कनेक्टिंक लिंकला दरड कोसळल्यानंतर लगेच वाहतूक बंद करण्यात आली.  मुंबई आणि पुणे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली किंवा वळवण्यात आली. राज्य सरकार आणि यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर  100 टन ढिगारा रस्त्यावर आला. ही दरड अशा भागात कोसळली की, जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नव्हती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. 

आणखी वाचा

Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला

Devendra Fadnavis on Missing Link: 'इन्फ्रामॅनचा डिझास्टर मॅन झाला', मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना घेरलं

पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget