एक्स्प्लोर
Advertisement
महाविद्यालयांच्या फी बाबत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांचे संकेत
लॉकडाऊनमुळे सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे फी मध्ये सवलत देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केलीय. यावर फी बाबत दिलासा देण्याचे संकेत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
पुणे : कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जातो आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे महाविद्यालयांनी फक्त ट्यूशन फी घ्यावी आणि बाकीचं अतिरिक्त शुल्क माफ करावं, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होते आहे. महाविद्यालयांतील लायब्ररी, जीम, कॅम्पस मेंटेनेंस यासाठी आकारण्यात येणारी फी माफ करावी, असा सुर विद्यार्थी आणि पालकांचा आहे. यासंदर्भात बोलताना फी बाबत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याचे संकेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
‘फीच्या संदर्भातलं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं म्हणणं मलाही पटतंय. त्यासंदर्भात कसा निर्णय घ्यायचा याची चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसांमध्ये विद्यार्थी आणि पालकांना अपेक्षित असलेला निर्णय विभागाकडून घेतला जाईल.’ असं उदय सामंत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
फक्त ट्युशन फी घेण्याची मागणी
पुण्यातील एलएलबीच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी फीमध्ये 50 टक्के सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. मागच्या सेमिस्टरमध्ये फक्त 10 दिवस कॉलेज झालं आणि लॉकडाऊन सुरु झाल. आताचं सेमिस्टरमध्येही सगळे विद्यार्थी घरी आहेत. काही कॉलेजचे तर ऑनलाईन क्लासेसही सुरु झालेले नाहीत, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कॉलेजने फक्त ट्यूशन फी घ्यावी आणि बाकीची फी माफ करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती.
कौतुकास्पद...! ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या आदिवासी मुलांना 'त्यांनी' दिले शिक्षणाचे धडे
खाजगी शाळांकडे पालकही हीच मागणी करत आहेत. शाळांनी फक्त ट्यूशन फी घ्यावी अशी पालकांची मागणी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पुर्ण फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांचं आनलाईन शिक्षण बंद केल्याच्या तक्रारीही येत आहेत.
उदय सामंत यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी फीबाबतीमध्ये दिलासा देण्याचे संकेत जरी दिले असले तरीही असा ठोस निर्णय कधी होतो याचीच विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे.
अंतिम परीक्षेचा निर्णय रखडलेला, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
राजकारण
परभणी
क्राईम
Advertisement