एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील राष्ट्रवादीचा नगरसेवक दीपक मानकरला 'मोक्का'
दीपक मानकर आज पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला शिवाजी नगर सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक दीपक मानकर याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. दीपक मानकर आज पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला शिवाजी नगर सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
मानकरने केलेले कृत्य आणि त्याच्यावर याआधी दाखल असलेले गुन्हे पाहता त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस पोलिसांनी केल्यानंतर न्यायालयाने ती मान्य केली.
दीपक मानकरकडे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने दोन जून रोजी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जगतापने दीपक मानकरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं.
सर्व ठिकाणी अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यावर पोलिसांसमोर हजर राहण्याशिवाय मानकर समोर पर्याय नव्हता. मोक्का अंतर्गत कारवाई करताना पुणे पोलिसांनी मानकर हा गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असून त्याच्यावर धमकावून जमिन बळकावण्याचे अनेक गुन्हे नोंद असल्याचं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement