Aditya Thackeray In Maval : भर सभेत आदित्य ठाकरे म्हणाले संजोग वाघेरेंच्या कानात एकच गोष्ट सांगितली अन्...
मावळ, पुणे : मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संज्योग वाघेरे यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
मावळ, पुणे : मावळ लोकसभा मतदार (maval Loksabha election) संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray In Maval) संजोग वाघेरेच्या कानात तुम्ही फक्त अर्ज भरा. अर्ज भरताना त्यात चूक होऊ देऊ नका. तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी जनतेनं घेतली आहे. मावळ मतदारसंघाने घेतली आहे, असं सांगितलं आणि विजयी होणार असल्याचा विश्वास दिला. यावेळी मोठ्या सभेचं आयोजनही करण्यात आलं होतं. या सभेत आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली आणि न केलेल्या कामांची यादी भर सभेत वाचली.
संजोग वाघेरेंच्या सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मतदारांना अनेक सल्ले दिले. शिवाय उबाठाच्या आणि ठाकरे घराण्याच्या शिकवणीची आठवणदेखील करुन दिली. आपण उन्हात असलो तरीही चालेल मात्र आपला कार्यकर्ता कायम सावलीत आणि सुरक्षित असला पाहिजे, अशी ठाकरे कुटुंबियांची शिकवण असल्याचं त्यांनी सांगितलं. मावळचे मतदार यंदा इतिहास घडवणार आहेत आणि देशात परिवर्तन घडवणार आहेत, असंही ते म्हणाले.
गेली दोन वर्षे अवकाळी पाऊस, दुष्काळ झालं. त्यावेळी एकतरी गद्दार मंत्री शेताच्या बांधावर आला का? मदत मिळाली का? मी खोटं बोलतोय का? त्यामुळं साध्याच केंद्रातील आणि राज्यातील सरकार पुढची पाच वर्षे परवडणार आहे का?, शेतकरी दिल्लीकडे आंदोलन घेऊन निघाले होते. तेंव्हा भाजप सरकारने लाठ्या चालवल्या. गोळीबार केला. अशा भाजपला तुम्ही मतदान करणार का?, असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, युवा वर्गाने सांगावं, गेली पाच वर्षे तुम्ही पाहिलेली आहेत. कोरोना मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आणि सरकारने कसं कार्य केलं, हे प्रकर्षाने दिसत होतं. पण या सरकारने इथले प्रकल्प घालवले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प जाऊ नये, म्हणून मी स्वतः आंदोलन केले. तो प्रकल्प इथं झाला असता तर आपल्याला नोकऱ्या मिळाल्या असत्या. सोबतच नवे प्रकल्प, वर्ल्ड कप मॅच हे सगळं गुजरातला पळवले. ठराविक राज्याचा विकास, इतर राज्यांची राख आणि गुजरातमध्ये रांगोळी, अशी सगळ्यांची साखरांगोळी या सरकारने केली असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
इतर महत्वाची बातमी-