मावळ लोकसभेत श्रीरंग बारणेंसमोर पार्थ पवारांसह बाळा भेगडेंचेही आव्हान? तिकिटासाठी 'बाणाला' 'काटे' तुडवत, 'कमळा'ला ही भेदावं लागणार?

Maval Lok Sabha Shrirang Barne vs ncp Parth pawar vs Bala Bhegade
Maval Lok Sabha 2024 : सत्ता संघर्षाच्या दोन भूकंपांमुळं मावळ लोकसभेत महायुतीची ताकद भक्कम झाल्याचं चित्र कागदावर दिसतेय. म्हणूनच शिंदे गटाकडे असणाऱ्या या लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनेही दावा ठोकलाय. यानिमित्ताने महायुतीत मोठा तिढा निर्माण झालाय. हे पाहता महायुती श्रीरंग बारणे, पार्थ पवार, बाळा भेगडे (Bala Bhegade) की ऐनवेळी चौथ्या उमेदवाराला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार?
Maval Lok Sabha constituency : छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा विभागलेला आणि पुणे-रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा मावळ लोकसभा मतदार




