Pune Timber Market Fire: पुणे टिंबर मार्केटमधील आग अजून धुमसतीच; अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
Pune Fire: पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Pune Timber Market Fire: पुणे टिंबर मार्केटमध्ये लाकूड सामान असलेल्या गोडाऊनमध्ये लागलेली भीषण आग अद्याप धुमसतीच. आग एवढी भीषण आहे की, शेजारील चार घरांनाही आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
पुणे टिंबर मार्केट येथील लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला लागलेली भीषण आग अद्याप सुरुच आहे. आग एवढी भीषण आहे की, आगीची झळ गोडाऊन शेजारील चार घरांनाही बसली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या तब्बल 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांचं प्रसंगावधान...
पुण्यातील टिंबर मार्केटमधील गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आग खूपच भीषण असल्यामुळे शेजारील 4 घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी आली. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
#WATCH | Massive fire breaks out at a furniture warehouse in Bhawani Peth area of Pune City at around 4 am today. A total of 18 fire tenders present at the spot and operation to douse the fire is underway. No casualties were reported in the incident.
— ANI (@ANI) May 25, 2023
(Video source: Pune Fire… pic.twitter.com/RNrf7Z840L
अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वात आधी आग आणखी पसरु नये यासाठी दक्षता घेतली. आधीच शेजारील चार घरं आगीच्या भक्ष्यस्थानी आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दक्षता घेत इतर घरं आणि बाजूलाच असलेली शाळा यामध्ये आग पसरू दिली नाही. तसेच, वस्तीमध्ये असलेले 10 सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आगीत कोणीही होरपळून जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर 20 अधिकारी आणि जवळपास 100 जवान आणि पुणे मनपा, पुणे कॅन्टोमेंट, पीएमआरडीए, पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशा एकूण जवळपास 30 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि खाजगी वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.